Thursday, October 22, 2020
Home अतरंगी क्रिटिक जयंत पाटलांचा खोटारडेपणा आला चव्हाट्यावर

जयंत पाटलांचा खोटारडेपणा आला चव्हाट्यावर

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये भीषण पूर परिस्थिती ओढवली आहे. निसर्गाने कोल्हापूर, सांगलीला जलमय केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वतोपरी सूत्रे हलवून तेथील रहिवाशांना वाचविण्यासाठी राजकीय दौरे रद्द करुन दिवस रात्र एक केला. सर्व राज्यातून एनडीआरएफच्या तुकड्या रवाना केल्या. बहुतांश नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य तातडीने सुरु केले. परंतु पुराचा तडाखा तीव्र असल्याने काही व्यक्तींचा त्यात मृत्यू झाला.

विरोधकांनी मात्र पूर परिस्थितीचे भान न ठेवता पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी जाहिरातबाजी करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटलांनी प्रसिद्धी मिळावी म्हणून खोटारडी सोशल मिडीयावर पोस्ट तयार केली. कोणत्याही प्रकारची मदत न करता ही बनावट फोटोशॉप करुन राष्ट्रवादी आणि जयंत पाटील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी किती तत्पर आहेत हे खोटे दृश्य जनतेसमोर उभे करण्याचा प्रयत्न केला गेला.

परंतु जयंत पाटलांचा खोटारडेपणा लपून राहिला नाही. भाजपाने त्यांचा खोटारडेपणा जगासमोर आणला त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलेला फोटो फोटोशॉप केलेला आहे असे दाखवून दिले. त्यांची पोलखोल झाल्यावर जयंत पाटलांची बोबडी वळली.

खोटे फोटोशॉप करून, खोटे स्पष्टीकरण देऊन आता राष्ट्रवादीवाले रडीचा डाव खेळत आहेत. तुम्ही स्वत: टाकलेले फोटो असलेले…

Posted by BJP Maharashtra on Sunday, August 11, 2019

अखेरीस त्यांनी फेसबुकवरील पोस्ट काढून टाकली आणि ट्विटर वर खोटारडे पणाची कबुली दिली.

सत्य उघडकीस आल्यावर जयंत पाटील यांनी सावरा सावर करण्यास सुरुवात केली यात त्यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांची १ ऑगस्टला जनशताब्दी होती. त्यावेळी विविध शाळांमध्ये खाऊ वाटप केले होते. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला फसवून जयंत पाटील यांनी ही पोस्ट फोटोशॉप करुन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आहे अशी दाखविली आहे.

जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांच्या भावनेचा अपमान केला आहे. कोणतीही मदत न करता दुसऱ्या मदतीला पूरग्रस्तांना मदत केल्याचे भासवून त्यांची विडंबना केली आहे. पूरात अडकलेल्यांची अशी थट्टा करणे कितपत शोभते. सरकारमध्ये असताना जनतेची कामे करत असे दाखवून पैसे खावून दिशाभूल केली आणि सरकारमध्ये नाही तर मदत न करुन मदत केल्याची थट्टा करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...