Thursday, October 22, 2020
Home अतरंगी क्रिटिक हे कुठलं सेक्युलेरिझम ? - ठराविक सिने कलाकारांनी उपस्थित केलेला महत्वाचा प्रश्न

हे कुठलं सेक्युलेरिझम ? – ठराविक सिने कलाकारांनी उपस्थित केलेला महत्वाचा प्रश्न

गेले काही दिवस झाले राजकारणाचे वारे आणखीनच जोरात वाहतायेत. निवडणूक जवळ आहे. पुन्हा एकदा राजकीय वाद विवादांना उधाण आले आहे. असे असताना आपले सिने कलाकार कुठे मागे राहणार? राजकारण आणि सिनेमा यांचे जुने मात्र जवळचे नाते आहे. आणि या दोन्ही क्षेत्रांचा एकमेकांवर मोठा परिणामही होतो. असे असताना मध्येच एक बातमी आली की एकूण ६०९ कलाकारांनी ‘मोदींना मत देऊ नका’ असे सांगणाऱ्या एका पत्रावर सही करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध केला आहे. मात्र त्या उलट ९०० कलाकार असेही आहेत , ज्यांनी पत्र लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय, शंकर महादेवन, अशी अनेक दिग्गज नावे आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पायल रोहोतगीचे व्हिडियोज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत. आणि यामध्ये तिने सरळ सरळ तथाकथित ‘सेक्युलर’ गॅंग वर प्रहार केला आहे. ज्यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये सामिल झाली, आणि तिने ‘हिंदू हिंसक होत चालले आहेत’ अशी टिप्पणी केली, त्यावर पायल ने आपल्या व्हिडियोमधून तिखट प्रहार करत तिच्यावर वार केला आहे. “भारत माता की जय बोलणे या देशात ‘कम्युनल’ झाले आहे मात्र ‘भारत तेरे टुकडे होंगे इंशाह अल्लाह अंशाह अल्लाह म्हणणे सेक्युलर’ असे म्हणत तिने ‘हे कुठलं सेक्युलेरिझम’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काश्मिरी पंडितांचा विषय देखील तिने उपस्थित केला आहे. 

त्याच बरोबर विवेक ओबेरॉय याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटाविषयी विचारले असता त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवला आहे. इथे प्रश्न हा नाहीये कि, कोण पंतप्रधानांना पाठिंबा देतं आणि कोण नाही? मात्र या कलाकारांनी सेक्युलरिझमचा प्रश्न उपस्थित केला आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. 

सेक्युलेरिझम म्हणजे पंथसमानता, धर्म समानता नाही, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्याचे ते लाडावलेलं आपलं ते लाडकं अशातला भाग आहे हा. काल समाजवादी पक्षाच्या आझमखानने जया प्रदा यांच्याविषयी अतिशय अभद्र अशी टिप्पणी केली. मात्र त्यावर विरोधी पक्षाच्या महिलांनी अवाक्षर सुद्धा काढले नाही. कारण ‘मुस्लिम वोट बँक’. या वोटबँकेला धक्का लागू नये या एका कारणामुळे इतक्या भीषण वक्तव्यावर कुणीच काहीच बोलले नाही. 

पायल रोहतगीच्या व्हिडियोमध्ये तिने उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे आहेत. हिंदू नावाचा वापर करुन हिंदूंच्या विरोधात ‘नफरत’ म्हणजेच तेढ निर्माण करणे अतिशय चुकीचे आहे, आणि उर्मिला मातोंडकर तेच करते आहे. काश्मीर म्हटले की केवळ काश्मिरी मुस्लिमच आठवतात, मात्र काश्मिरी पंडितांना सगळे विसरतात.  बांग्लादेशी बंगाली झाले, मात्र बंगाली आज दुर्गापूजा देखील साजरी करु शकत नाहीयेत. जे खरच हिंदु धर्माप्रति असहिष्णु आहेत, ते आज ठामेठोकपणे स्वत:ला सेक्युलर म्हणतात, आणि जे खरंच सेक्युलर आहेत, हिंदू धर्मात ज्यांनी अनेक पंथांना समाविष्ट केले आहे, ज्या हिंदू बहुल राष्ट्रात मुस्लिम देखील हसत खेळत राहू शकतात, तेच आज ‘कम्युनल’ झाले आहेत, त्यांना आज संघी दहशतवादी म्हणवल्या जात आहे. जो खरा दहशतवादी आहे, त्याला वाहवत गेलेला, भटकलेला बिचारा तरुण म्हटले जात आहे, आणि जे खरंच देशाचे जवान आहेत, ते आज ‘मानवाधिकाविरोधी’ असल्याचे सांगण्यात येत आहे. दाहसंस्कारासाठी लाकडाचा वापर करणे अचानक पर्यावरणाप्रति असंवेदनशीलता झाली आहे, आणि जी जमीन शव पुरण्यासाठी वापरली जाते, ती जन्मसिद्ध अधिकार मानली जाते. 

हा इतका विरोधाभास का? हे असे कसे सेक्युलरिझम? ठराविक मुद्द्यांवर मात्र देशात किती भयावह वातावरण आहे असे भासवले जाते, आणि ठराविक मुद्यांवर जिथे खरच अन्याय झाला असतो, तिथे मात्र अवाक्षरही काढल्या जात नाही. निवडणुका जोरावर असताना स्वरा भास्कर, गौहर खान, नसीरुद्दीन शहा, यांच्यासारखे अनेक सिने कलाकार ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून भरपूर बडबड करतात, मात्र जिथे खरच त्यांच्या बोलण्याची आवश्यकता असते तिथे मात्र ते मूग गिळून गप्प असतात, प्रश्न अखलाकचा असेल तर सर्व सिनेसृष्टी एकवटून त्याला विरोध करते, मात्र प्रश्न केरळ मधील संघ स्वयंसेवकांच्या हत्येचा असेल, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा असेल तर तो प्रश्नच मुळी कम्युनल होऊन जातो. अशा विचारधारेचा निषेध करणारेही सिने कलाकार आहेत, हे पाहून मात्र आनंद होतो. 

एकूण काय ठराविक ठिकाणी फेमिनिझम आणि सेक्युलेरिझम आठवणाऱ्या कलाकारांना उत्तर देणारे काही कलाकारही सिनेसृष्टीत आहेत, आणि केवळ एका पंतप्रधानांच्या पाठिंब्यासाठी नव्हे तर या अशा अन्यायाविरुद्ध ते एकवटले आहेत हे बघून सामान्य माणसाला आनंद नक्कीच होतो. 

सरकार कोणाचे येणार हे तर काळच सांगेल मात्र काय योग्य आहे आणि काय अयोग्य, कुठे दुटप्पीपणा होतोय हे बघून आपला निर्णय घेणं मात्र आपल्या हातात आहे. नाही का? 

– निहारिका पोळ सर्वटे

Niharika Pole Sarwate
Niharika Pole Sarwate
A journalist by profession. Masters in journalism and mass communication. Love to write on politics, culture, entertainment, Lifestyle or any other topic related to Youngsters. Kathak Dancer by heart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...