Thursday, October 22, 2020
Home अतरंगी क्रिटिक मोदींच्या शपथविधीत शरद पवारांचा अपमान झाला का? जाणून घेऊ नेमके खरे काय...

मोदींच्या शपथविधीत शरद पवारांचा अपमान झाला का? जाणून घेऊ नेमके खरे काय आहे

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास दाखविला आणि त्यांना बहुमतांनी निवडून दिले. नरेंद्र मोदींना हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांच्या या प्रयत्नांचा तसूभरही फरक निवडणुकीच्या निकालात दिसून आला नाही. या विरोधकांच्या यादीत महाराष्ट्रातून सर्वात पुढे होते ते म्हणजे राजकारणात खालच्या पातळीचे राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार.

सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे हरविण्यासाठी पवारांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु या सर्व प्रयत्नांचा उलट परिणाम पवारांच्या पक्षावर झाला. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. सुरुवातीला शरद पवार त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नासाठी स्वतः निवडणुकीला उभे राहणार होते. परंतु त्यांना बहुतेक हरण्याची चाहूल लागली होती म्हणून त्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला.

पवारांचा ५ व्या रांगेचा वाद नेमका काय आहे

संपूर्ण भारतभर भाजप पक्ष निवडून आल्यावर सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मोदींकडून निमंत्रण पाठविण्यात आले होते. इतकेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी देखील मोदींच्या शपथ विधी कार्यक्रमाला उपस्तिथ होते. सर्व प्रमुख पाहुण्यांना व्ही छापील निमंत्रण पत्रक देण्यात आले होते. पवारांच्या कार्यालयातील काही निकटवर्तीयांना किंवा खुद्द शरद पवारांनी हे निमंत्रण पत्रक वाचून वायफळ वाद निर्माण केला की, पवारांना व्ही म्हणजे पाचव्या रांगेचे निमंत्रण पत्रक दिले आहे. या अपमानकारक वागणुकीमुळे शरद पवार शपथविधी कार्यक्रमाला उपस्तिथ राहू शकले नाही. यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांचा असा अवमान करणे सरकारला शोभते का? असे तथ्य नसलेले आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पवारांचे निकट वर्तिय पत्रकार सोशल मीडियावरुन सरकार आणि मोदींवर करत होते. नेमके या प्रकरणात कितपत तथ्य आहे आणि खरे काय आहे, हे आपण जाणून घेऊया.

राष्ट्रपती भवनच्या सचिवांनी सांगितले खरे काय आहे

शरद पवारांचा अवमान झाला असा कांगावा सर्व सोशल मीडियावर राष्टवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पवारांच्या जवळील पत्रकार मित्रांनी केला होता. राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी या प्रकरणाचा खुलासा ट्विटरवर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ३० मी रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले होते. परंतु शरद पवार दिल्लीत असून देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्तिथ राहू शकले नाही. पवारांना देण्यात आलेल्या निमंत्रणात त्यांनी निरर्थक गैरसमज करुन घेतला किंवा यावरून राजकीय हेतूने मोदींविरोधात चुकीचा समज निर्माण व्हावा याकरिता अफवा पसरविली की त्यांना शपथविधी कार्यक्रमात ५ रांगेचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु याबद्दलचे खरे तथ्य हे आहे की निमंत्रण पत्रिकेत व्ही म्हणजे रोमन अंक ५ नसून, व्ही म्हणजे व्हीव्हीआयपी निमंत्रण होते. व्हीव्हीआयपी निमंत्रण म्हणजे पहिल्या रांगेत बसण्याचे निमंत्रण. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या रांगेत सहृद पवार यांना सन्मान देण्यात आला होता. शरद पवारांचा अवमान करण्याचा राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांचा किंवा नरेंद्र मोदी यांचा कोणताही हेतू नव्हता. असे राष्ट्रपती भवनातील माध्यम सचिव अशोक मलिक यांनी स्पष्ट केले.

शपथविधी कार्यक्रमात व्ही, व्ही १, व्ही २, व्ही ३, व्ही ४ असे भाग करण्यात आले होते. यामधील व्ही भाग हा प्रमुख पाहुण्यांकरिता राखीव ठेवण्यात आला होता. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद, सपा पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह असे दिग्गज मंडळींकरीता व्ही भाग आरक्षित करण्यात आला होता. याच रांगेत शरद पवारांची देखील जागा राखीव होती. परंतु त्यांच्या गैरसमजामुळे किंवा मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्तिथी दर्शविली. राष्ट्रपती भवनातील मध्य सचिव अशोक मलिक यांच्या स्पष्टीकरणामुळे नक्कीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तोंड लपवीत फिरत असणार यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...