Thursday, October 22, 2020
Home अतरंगी गम्मत-जम्मत झोप येते म्हणून नाही तर या फायद्यांसाठी येते जांभई

झोप येते म्हणून नाही तर या फायद्यांसाठी येते जांभई

‘जांभई’ आली की आपण म्हणतो झोप आली किंवा थकवा आला आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते जांभई येण्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार असे दिसून आले की, जांभई येणे म्हणजे शरीराकडून घडवून आणलेला व्यायाम आहे. या व्यायामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी त्याला चालना दिली जाते. तसेच शरीराचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत मिळते.

१. कानाचे कार्य सुधारण्यास मदत मिळते

जांभई दिल्याने कानामध्ये होणार त्रास, वेदना आणि बधिरपणा कमी करण्यासाठी मदत होते. संशोधनानुसार वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले की जांभईमुळे कानाच्या पोकळीतील हवेचा नियंत्रित राहतो आणि कानाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

२. मेंदूच्या ऑक्सिजन पुरवठ्यात सुधार होते

जेव्हा जांभई येते तेव्हा शरीरात ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण वाढते. यामुळे फुफ्फुसात ऑक्सिनजनचे प्रमाण वाढते आणि याचा चांगला परिणाम म्हणजे शरीरात कार्बनडाय ऑक्सिजन साचून राहत नाही. त्यामुळे मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ होते.परिणामी मेंदूचे कार्य सुधारते.

३. रक्त प्रवाहात सुधार होऊन मेंदूला चालना मिळते

संशोधनकांच्या निष्कर्षानुसार मेंदू शांत होतो आणि त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. मज्जासंस्थेला जांभईमुळे चालना मिळते. जांभई दिल्याने मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा होते. जांभई शरीरासाठी कॅफिनसारखे काम करते. ज्यामुळे तुमचा मेंदू जलदगतीने काम करण्यास सुरु करतो.

४. प्रेम व्यक्त केले जाते

२०११ साली अमेरिकेच्या संशोधनानुसार २३ चिपांझिंना ओळखी आणि अनोळखी जांभई देणाऱ्या चिपांझिंचे व्हिडीओ दाखविण्यात आले. या प्रयोगानुसार असे दिसून आले की ओळखी चिपांझिंना पाहून जांभई देणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. यानुसार जांभई ही संसर्गिक आहे. आपल्या प्रेमळ किंवा ओळखीच्या व्यक्तीला आलेली पाहून तुम्हाला देखील येऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या तुमच्याविषयी नक्कीच प्रेम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...