Wednesday, October 21, 2020
Home इतर या देशातील शिक्षण पद्धती आहे आगळी-वेगळी !

या देशातील शिक्षण पद्धती आहे आगळी-वेगळी !

सध्या वार्षिक परीक्षांचा काळ सुरु आहे. मुलांची अभ्यासाची धावपळ आहे. भारतात परीक्षा म्हटले की अनेक विद्यार्थी धास्ती घेतात. काही विद्यार्थ्यांची आकलन क्षमता चांगली तर काहींची कमी असते. भारतातील शिक्षण पद्धतीनुसार अभ्यास परिक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविते. मुलांचे पालक, शिक्षक सर्वजण विद्यार्थ्यांवर ‘अभ्यास कर आणि अभ्यास कर’ असा जप करत असतात. भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास हा फक्त आणि फक्त पुस्तकातच दडला आहे. प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा पहिला आला पाहिजे. प्रत्येकाला इंजिनिअर, डॉक्टर बनविण्याच्या धावपळीत आहेत.

चित्रकार, लेखक,कवी, ऑलिम्पिक खेळाडू किंवा इतर राष्ट्रीय खेळाडू या क्षेत्रात मुलाचे भविष्य करणे म्हणजे भविष्य धोक्यात जाईल अशी भीती अनेक भारतीय पालकाला वाटत असते. याचा अर्थ असा नाही की या क्षेत्रांकडे भारतात कोणीही जात नाही. ज्या व्यक्ती या क्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक विरोधाला सामोरे जावे लागते. यामध्ये तो यश कमावितो किंवा लोकांच्या विरोधामुळे क्षेत्र सोडून स्वप्नांना राम राम करतो. या सगळ्याचे मूळ कारण म्हणजे भारतीय शिक्षण पद्धती.

इतर देशातील शिक्षण पद्धती भारतापेक्षा वेगळी आणि विध्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडीसाठी प्रोत्साहित करणारी आहे. यामध्ये काही देशातील शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना गोडी लावणारी तर काही सक्तीची आहे. चला तर मग जाणून घेऊया या देशांमधील आगळी-वेगळी शिक्षण पद्धती.

१. इटलीतील टूरीन शहरातील शाळा जगातील सर्वात लहान शाळा मानली जाते. कारण या शाळेत एकावेळी एक शिक्षक एका विद्यार्थ्याला शिकवितो. अशी शाळा आपल्या देशात असती तर प्रत्येक विद्यार्थी हुशार झाला असता, परंतु एका विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आपल्या लोकसंख्येयमुळे परवडण्यासारखे नाही.

२. उत्तर युरोपातील फिनलँड देशात वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत मुलाला किंवा मुलीला शाळेत दाखल करुन घेत नाहीत. जगातील मुलांनी शाळेत जाण्याच्या वयानुसार सर्वात उशिरा शाळेत पाठविणारा देश आहे.

३. इराण हा असा देश आहे ज्यामध्ये मुले व मुली यांना शिकविण्यासाठी वेगवेगळी शाळा आहे. मुले व मुली यांच्या शालेय शिक्षणापर्यंत शिकविण्याची ही विभिन्न पद्धत वापरली जाते. महाविद्यालयात त्यांना एकत्रित बसविले जाते. इतकेच नाही तर शालेय शिक्षणासाठी मुलींना स्त्रिया आणि मुलांना पुरुष शिकवितात.

४. केनिया देशात मुलांना शाळेत जाणे बंधनकारक नाही. परंतु तरी देखील ही मुले शाळेत जातात. अशी संधी आपल्या देशात का नाही? आपोळ्या देशात तर नर्सरी पासून अभ्यासाचे दडपण सुरु होते. खेळण्याच्या वयात हातात पुस्तके दिली जातात. आपल्याला व्यवस्थित बोलताही येत नसते आणि शाळेच्या मास्तरीण बाई छडी घेऊन ‘म्हणा ए फॉर अँप्पल’ अशी धाक दाखवितात.

५. जपान मधील मुले जगातील सर्वात स्वतंत्र मुले म्हणून ओळखली जातात. या देशातील मुले शाळेत एकटी जातात आणि स्वतःच्या वर्गाची स्वच्छता सुद्धा स्वतःच करतात. आपल्याला शाळेत सोडायला आई किंवा बाबा जर दोघेही कामावर तर रिक्षा किंवा गाडी ठरवलेली असते. आपल्या देशातील मुले कचरा गोळा करण्याऐवजी ढीगभर पेन्सिल, कागदाचा कचरा करतात.

दुसरी गोष्ट म्हणजे जपानमध्ये नैतिक मूल्य शिक्षण गणितासारखे शिकवितात. आयुष्यात कसे जगावे, कसे वागावे आणि कोणती ध्येय जोपासावीत या महत्वाच्या गोष्टी गणिताच्या जोडीने शिकविल्या जातात. म्हणूनच जपान प्रगत देशांमध्ये गणला जातो. या देशातील मुले जगात विविध क्षेत्रात नाव कमवीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...