Thursday, October 22, 2020
Home अतरंगी कुणीतरी येणारं येणारं गं ! येणार कोण मुलगा की मुलगी ओळखण्याच्या या...

कुणीतरी येणारं येणारं गं ! येणार कोण मुलगा की मुलगी ओळखण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धती

सध्या भारतातील बहुतांश भागात मुलगा किंवा मुलगी असा भेद केला जात नाही. भारताच्या खेड्या-पाड्यातील व्यक्ती सुद्धा सुशिक्षित आहेत, त्यामुळे मुलापेक्षा मुलीच श्रेष्ठ असा हट्ट धरतात. परंतु भारताच्या काही भागात अजूनदेखील मुलगा हवा म्हणून गर्भपात करण्याच्या घटना घडतात. या घटना घडू नयेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा कार्यक्रम सुरु केला आहे. इतके असून देखील काही व्यक्ती जुन्या आणि बुरसटलेल्या रूढी परंपरांना धरुन राहतात. भारतात मुलगा होणार की मुलगी होणार हे ओळखण्याच्या अनेक पद्धती. तसेच काही शास्त्रज्ञांनी देखील संशोधन करुन काही रंजक पद्धतींचा अंदाज वर्तविला आहे. काय आहेत या अंदाज करण्याच्या आगळ्या-वेगळ्या पद्धती जाणून घेऊया.

१. नावडत्या पदार्थानुसार

गरोदर स्त्रीला या काळात विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. पदार्थाच्या आवडीनुसार गरोदर स्त्रिया काही पदार्थ खाण्यासाठी देखील नकार देतात. त्यांना हे पदार्थ खाण्याची इच्छाच होत नाही. काही संशोधनानुसार असे आढळून आले की गरोदर महिलेला दुपारच्या जेवणानंतर मळमळत असेल तर मुलगा होण्याची शक्यता आहे.

२. गरोदर स्त्रीच्या बदलत्या स्वभावानुसार

गरोदरपणात स्त्रियांच्या स्वभावामध्ये अधिकवेळा बदल होत असतो. स्त्रियांच्या गरोदरपणात स्वभाव बदलण्याच्या या प्रकाराला इंग्रजीमध्ये ‘मूड स्विंग’ म्हणतात. ‘जर्नल ऑफ सायकॉलॉजी अँड बिहेवियरल’ नुसार गरोदरपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जर स्त्रियांची सतत चिडचिड होत असेल तर त्यांना मुलगा होण्याची शक्यता असते. याउलट गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जर स्त्रिया शांत आणि चिडचिड करत नसतील तर मुलगी होण्याची शक्यता असते.

३.साखरपुड्याच्या अंगठीचे भाकीत

मुलगा होणार की मुलगी हे गरोदरपणाच्या पूर्वीपासून ओळखण्याची हि भारतातील सर्वश्रुत पद्धत आहे. या पद्धतीमध्ये स्त्रियांची साखरपुड्यात मिळालेली अंगठी वापरण्यात येते. या अंगठीला दोरा बांधून ती पोटाजवळ धरावी. अंगठी फिरविल्यानंतर मागे-पुढे सरकली तर मुलगा होऊ शकतो. या पद्धतीची दुसरी बाजू म्हणजे अंगठी गोलाकार स्तिथीत सरकली तर मुलगी होण्याची शक्यता वर्तविली जाते.

४. चेहऱ्यावरुन अंदाज

ही पद्धत देखील भारताच्या पारंपरिक पद्धतीमधील एक पद्धत आहे. घरातील वृद्ध व्यक्ती या पद्धतीच्या आधारे अंदाज व्यक्त करतात. या पद्धतीनुसार स्त्री गरोदर असताना तिच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरुम आले आणि केसांमध्ये रुक्षपणा वाढला तर मुलगी आईचे सौंदर्य हिरावून घेत आहे. याउलट जर गरोदर स्त्रीच्या चेहऱ्याचे आणि केसांचे सौंदर्य खुलले तर मुलगा होण्याचे भाकीत केले जाते.

५. डोहाळ्याचे भाकीत

ही पद्धत गरोदर स्त्रीच्या डोहाळे कार्यक्रमा दरम्यान अवलंबिली जाते. या पद्धतीनुसार गरोदर स्त्रीला गॉड खाण्याची इच्छा होत असेल तर गोड स्वभावाची मुलगी होऊ शकते. दुसरीकडे जर तिखट खाण्याची इच्छा होत असेल तर मुलगा होऊ शकतो. काही डोहाळे कार्यक्रमाच्या वेळी गरोदर स्त्रीला मिठाई ओळखण्यास सांगितले जाते. या निवडीमध्ये पेढा आला तर मुलगा होणार आणि जर बर्फी आली तर मुलगी होणार असाही अंदाज केला जातो.

६. गर्भात होणाऱ्या हालचालीवरुन

गर्भाच्या हालचालींवरून लिंग निदान करण्याची देखील एक जुनी पद्धत आहे. यामध्ये गर्भातील बाळ लाथ कोणत्या दिशेला मारतो यावरून ठरविले जाते. गर्भामध्ये बरगड्यांच्या वरच्या बाजूस बाळ हालचाल करत असल्यास मुलगी होऊ शकते. या पद्धतीची दुसरी बाजू म्हणजे बाळाने पोटाच्या खालच्या बाजूस हालचाल केली तर मुलगा होऊ शकतो असा अंदाज वर्तविला जातो.

७. गर्भातील बाळाच्या ठोक्यावरुन

मुलगा किंवा मुलगी ओळखण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. या संदर्भात अद्याप कोणत्याही शास्त्रज्ञाने केलेले संशोधनाची बाब दिसून आलेली नाही. तरी देखील ही प्रचलित आहे. गर्भातील हृदयाचे ठोके १४० बीएमपी पेक्षा अधिक असतील तर मुलगी आणि या मर्यादेपेक्षा कमी असतील तर मुलगा होऊ शकतो.

टीप: वरील नमूद केलेल्या गोष्टी या केवळ शक्यता आहेत. प्रत्येक गरोदर स्त्रीची शारीरिक अवस्था आणि गर्भाची परिस्तिथी विभिन्न असू शकते. त्यामुळे वरील अंदाजाविरुद्ध घडल्यास आश्चर्य व्यक्त करु नये. मुलगा किंवा मुलगी दोंघांपैकी कोणीही झाल्यास दुःख व्यक्त करण्याऐवजी आनंद व्यक्त करावा. सध्याच्या युगानुसार मुलांपेक्षा मुली श्रेष्ठ आहेत त्यामुळे मुलीचा जन्म झाल्यास अधिक आनंद व्यक्त करावा. दोघांमध्ये फरक करण्याऐवजी मुलगा-मुलगी समान आहेत असेच मानावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...