Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन 'बाला' ची केस स्टडी !

‘बाला’ ची केस स्टडी !

टक्कल आणि न्यूनगंड या विषयावर मनोरंजक आणि निखळ विनोद असणारा बाला हा  सिनेमा प्रेक्षकांसाठी सज्ज आहे . बाला तरुणाई सोबत प्रौढांसाठी ही हास्याची मेजवानी ठरत आहे  आणि म्हणूनच हा सिनेमा गर्दी खेचण्यात यशस्वी ठरतो आहे. एका मागो माग एक सात सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता आयुष्यमान खुराना प्रोड्युसर्ससाठी लकी चार्म ठरत आहे. दम लगा के हैशा आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमधील आयुष्यमान आणि भूमी पेडणेकर  या दोघांची जोडी  प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे या सिनेमात ही त्यांची केमिस्ट्री खुलून आली आहे.

ऐन तारुण्यात केस गळत असल्यामुळे आपल्याच आसपासचे लोक जेव्हा खिल्ली उडवतात त्यावेळी अशा तरुणांची नेमकी अवस्था कशी असेल हे ‘बाला’ या चित्रपटातून पडद्यावर साकारण्यात आलं. अशा प्रकारच्या विषयावर गॉन केश आणि उजडा चमन हे सिनेमे अलीकडच्या काळात येऊन गेले . पण बाला हा सिनेमा वेगळा ठरतो त्याच्या लेखन शैली आणि अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनामुळे.  

बालमुकुंद उर्फ बाला (आयुष्मान खुराना ) टक्कल पडल्याने आत्मविश्वास गमावलेला असताना त्याची वर्गमैत्रीण मात्र आपल्या काळ्या रंगाला कोणत्याही पद्धतीने आड येऊ न देता पुढे शिकत वकील बनलेली असते. बालाचे वयाच्या २५ व्या वर्षीच केस गळू लागतात. अकाली केसगळती होत असल्यामुळे तो २०० पेक्षा जास्त उपाय करुन पाहतो. पण त्याच्या पदरी अपयश येत असतं . तो वैतागून  विगचा वापर करायला सुरुवात करतो . विग लावल्यानंतर त्याची मैत्रीण लतिका त्रिवेदी( भूमि पेडणेकर) त्याला कायम चिडवत असते. याचदरम्यान त्याची ओळख परी मिश्रा (यामी गौतम) हीच्याशी होते. विशेष म्हणजे परीचे केस प्रचंड सुंदर असतात. ज्यावेळी बाला, परी आणि लतिका यांची भेट होते. तेव्हा खऱ्या अर्थाने या चित्रपटाची रंगत वाढते.

भारतीय लोकांच्या सौंदर्याच्या कल्पना, समाजाचे पूर्वग्रह आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या हेच विनोदी ढंगाने मार्मिकरित्या कथेत मांडले आहे. हल्ली  दिखाऊपणाच्या जगात दिसण्यावर असलेला भर यासाठी टिकटॉक व्हिडिओचा केलेला वापर यामुळे हा चित्रपट लक्षात राहतो. देसी कथा, मध्यमवर्गीय कुटुंब, कानपुरी भाषेचा वापर आणि ज्वलंत विषयांमुळे या सिनेमाचे प्रसंग आपल्या आजूबाजूलाच घडत असल्यासारखे वाटतात. सौरभ शुक्ला , जावेद जाफरी , सीमा पाहवा , या कलाकारांनी ही सिनेमाला चारचाँद लावले आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत नक्की पहावा असाच हा सिनेमा आहे.

– प्राची पाखरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...