Thursday, October 22, 2020
Home मनोरंजन कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

बॉलिवूडसाठी दहशतवादावरचे सिनेमे काही नवीन नाहीत. देशभक्ती , एक्शन  आणि ड्रॅमा या धाटणीचे सिनेमे आपण पिढ्यानपिढ्या बघत आलो आहोत. बॉर्डर सिनेमा ते वॉर सिनेमा हे त्याच पठडीतले सिनेमे आहेत. आता या देशभक्ती पर  सिनेमांमध्ये नवीन काय बरं  करायचं तर ? तर दिग्दर्शक आदित्य दत्तने हाय इंटेन्सिटी ऍक्शन असणारा, कमांडो ३ हा सिनेमा बनवला. कमांडो आणि विद्युत जामवाल हे जणू आता समीकरणच झालं  आहे. डबल बॉडीचा वापर न करता विद्युत स्वतः सगळे स्टंट्स करतो  आणि म्ह्णूनच तो बॉलिवूडचा खरा कमांडो आहे.

आपल्या देशावरचा मोठा दहशतवादी  हल्ला रोखण्यासाठी विद्युत जामवाल ज्याचं या सिनेमातलं नाव आहे करण सिंग डोगरा.   हा आपलं  तन- मन – धन अर्पण करायला तयार असतो . गुलशन देवैया (बराक अन्सारी) हा लंडनमधील दहशतवादी संघटनेचा नेता आहे . हा तरुणांचं ब्रेन वॉश करून, त्यांना आतंकी जाळयात अडकवत असतो.   दहशतवाद्यांची योजना उधळून लावण्यासाठी कमांडो करणसोबत या मिशनवर एन्काऊंटर स्पेशलिस्ट भावना रेड्डी (अदा शर्मा) हिची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश इंटेलिजेंसची मल्लिका सूद (अंगिरा धार) आणि अरमान (सुमित ठाकुर) देखील या मिशनमध्ये करणची मदत करत आहेत. कमांडोच्या टीमला  दहशतवादी हल्ल्यापासून देशाला वाचवता येतं  का? बराकचं  पुढे काय होतं? या सगळ्याचं  थ्रिलिंग नाट्य सिनेमात दाखवण्यात आलं  आहे.

‘आशिक  बनाया आपने’ हा सिनेमा बनवणाऱ्या आदित्य दत्तने कमांडो ३ चं  दिग्दर्शन केलं आहे. कथा , नाट्य , सिनेमेटोग्राफी,  डायलॉग्स सगळं सिनेमात अगदी मजबूत आहे. सिनेमा कमी पडतो ते हिरो हिरोईनची केमिस्ट्री , गाणी यामध्ये . शिवाय या सिनेमात विद्युतच्या एक्शन बरोबर त्याच्या अभिनयाला ही दिग्दर्शक पैलू पडू शकला असता. पण तसं झालं  नाही. त्यामुळे हा सिनेमा विद्युतच्या कमांडो १ आणि २ पेक्षा फार काही निराळा वाटत नाही. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगला  आहे. अ‍ॅक्शन डायरेक्टर अँडी लॉग स्टंट, आलन अमीन आणि रवि वर्मा यांचं काम वाखाण्याजोगं आहे. त्यांनी विद्युत कडून चांगलीच मेहनत करून घेतली आहे. एकंदरीतच सिनेमा बरा  आहे. एक्शन लव्हर्सना आवडेल असाच हा सिनेमा आहे.

Prachee Pakhare
Prachee Pakhare
मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिज्म, टी व्ही अँकरिंग आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पारंगत. अभिनय, गायन , फॅशन आणि फिचर रायटिंगची आवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...