Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन कोटींच्या घरात  कमाई करणारी 'हिरकणी'

कोटींच्या घरात  कमाई करणारी ‘हिरकणी’

मराठी चित्रपट सृष्टी नेहमीच निरनिराळे प्रयोग करत असते, आता या प्रयोगामध्ये भर पडली आहे हिरकणी या सिनेमाची. आपण आपल्या लहानपणी आजीची गोष्टिमंधून ही कथा नक्कीच ऐकली किंवा वाचली असेल  आणि ज्यांनी नाही ऐकली त्यांच्यासाठीच हा ऐतिहासिक कथेवर आधारित सिनेमा आहे ज्याचं नाव आहे हिरकणी . यंदाची दिवाळी ऐतिहासिक आणि मराठमोळी पद्धतीने साजरी करण्यासाठी दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद ओकने माऊलीच्या धैर्याची गोष्ट सांगणारा ‘हिरकणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

इतिहासातल्या नाट्यपूर्ण घटना सर्जनशील लेखक-कलावंताना कायम साद घालतात आणि ही मंडळी इतिहासातला हा काळाचा तुकडा वर्तमानात पुन्हा एकदा उजळून काढतात. तसाच काहीसा प्रयत्न ‘हिरकणी’ या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वाडीतील हिरा धनगरणीची ही गोष्ट. दूध विकायला रोज रायगडावर जाणाऱ्या हिराला एका संध्याकाळी उशीर होतो. ती गडावरच अडकते. पण तान्ह्या बाळासाठी आसुसलेली हिरा गडावर थांबत नाही. ती  पश्चिमेचा कडा उतरायला निघते.

तिने कडा उतरायला सुरुवात करण्यापासून ते कडा उतरून ती बाळापर्यंत पोहोचण्याचा काळ हा खरा नाट्याचा संघर्षमय काळ. एका आईची घालमेल, तिच्या आईपणाच्या जिद्दीला थोपवू पाहणारा बेलाग पश्चिम कडा, त्यातील कडेकपारी-खाचखळगे, चढ-उतार, झाडंझुडपं कुणीही हिंमत हरेलच पण हिरा हरत नाही. ती पडते-झडते, तरी उतरत राहतेयाच संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी म्हणजे ‘हिरकणी’. ही हिरकणी इतकी सुपरहिट ठरली आहे की तिने बॉलिवूडच्या हाऊसफुल्ल या सिनेमाला ही मागे टाकलं  आहे आणि सिनेमा थिएटर बाहेर हिरकणीसाठी हाऊसफुल्लचे बोर्ड लागले  आहेत.

हिराच्या भूमिकेतली सोनाली कुलकर्णी आपल्या सहज अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकते. आपण नेहमीच तिला डान्सिंग डॉल या रूपात बघत आलो आहोत. पण या सिनेमात तिच्या अभिनयाचा कस  नक्कीच लागला आहे. तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत अमित खेडेकर यांनी चांगली कामगिरी केली आहे.

दीड  तासांचा हा सिनेमा लहान जरी असला तरी हा अर्थपूर्ण आहे. कथानक अजिबात भरकटत नाही, याचं  सगळं श्रेय पटकथा लेखक चिन्मय मांडलेकर याला जातं. तर लोकसंगीतामुळे कथानक आणखीनच खुलून येत आहे. लोकेशन, सिनेमटोग्राफी, व्ही एफ एक्स याचा कमालीचा मेळ साधला असल्यामुळे सिनेमा पाहताना नक्कीच भारावून जायला होतं.

हिरकणी ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या आठवड्यात मराठी आणि हिंदी असे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी पाच चित्रपटांची मेजवानी मिळाली. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. ‘हिरकणी’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही दिवसांत, महाराष्ट्रभरात सोमवारी १५० आणि मंगळवारी सुद्धा १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफुल झाले. इतकेच नव्हे तर एका दिवसात ७० पेक्षा जास्त शोज वाढले आणि महाराष्ट्रात अनेक थिएटर्स देखील वाढले आहेत.

मराठीमूडच्या टीम कडून कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या हिरकणीला शुभेच्छा !

– प्राची पाखरे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...