Thursday, October 22, 2020
Home मनोरंजन 'मरजावा' ने मार डाला!

‘मरजावा’ ने मार डाला!

“सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं ” हे गाणं आपण ऐकलंच असेल. हे गाण्याचे बोल मरजावा सिनेमाच्या नायकाला तंतोतंत लागू होतात. पॉसिटीव्ह शेड असणारा हा ‘दादा’ आहे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, म्हणजे रघु.  या रघुला हिरो असल्यामुळे दिग्दर्शक मिलाप झवेरीने लार्जर देन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हाच  समजलं  होतं की ही एक एक्शन लव्ह स्टोरी आहे. पण सिनेमा बघितल्यवर कळलं की सिनेमात नुसताच झोलझाल आहे. सिनेमाचा प्लॉट खूपच कॉमन आहे. अगदी ८० च्या काळातलं  कथानक असावं  असं. शूटिंग दरम्यान म्हणे सिनेमाची नायिका आणि नायक अर्थात तारा आणि सिद्धार्थ चं ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन मेळ जमला  पण सिनेमा इग्जहेक्यूशन आणि पटकथा यांचा मेळ  काही जमलेला नाहीये.  याचं  मुख्य कारण म्हणजे दिग्दर्शक मिलाप झवेरी. क्या कूल है हम , मस्तीजादे अशा प्रकारचे तद्दन बोरिंग कॉमेडी सिनेमे केलेल्या दिग्दर्शकाने हात घातला आहे एका एक्शन लव्ह स्टोरीला आणि तिथेच त्याने माती खाल्ली.

मोठ्या शहरातला मोठा डॉन अण्णा (नासिर), त्याचा मुलगा विष्णू ( रितेश देशमुख ) आणि मानलेला मुलगा रघु ( सिद्धार्थ मल्होत्रा ). या दोन्ही मुलांचं एकमेकांशी कधीच जमत नाही. रघुवर  प्रेम करते  आरजू ( राकुलप्रीत ) , पण हा रघु तिच्यावर प्रेम न करता प्रेम करतोय झोयावर ( तारा सुतारीया ). रघु झोया वर  इतकं  प्रेम करतो की तो चांगुलपणाची वाट पकडतो.  जीवापाड प्रेम करणाऱ्या याच झोयाचा रघु एक दिवस खून करतो. तो असा का करतो , हे बघण्यासाठी चित्रपट पहावा लागेल. पण स्टोरी प्रमाणे कारण ही तेवढंच  जुनं  आणि साहजिक आहे  आणि ते म्हणजे सिनेमाचा व्हिलन विष्णू! विष्णूला सिनेमात अभिनयाला खूप स्कोप आहे.  रितेश देशमुखने विष्णूची व्यक्तिरेखा  छान साकारली आहे . दम  नसलेली स्क्रिप्ट आणि भले मोठे डायलॉग, हे ऐकून जणू हसूच फुटतं. सिद्धार्थ आणि रितेशचं  वैर तुम्हाला एक व्हिलन या सिनेमात बघायला मिळालं होतं. त्या सिनेमा एवढी मजा या सिनेमात अजिबात नाहीये.

या दोघांना घेऊन सिनेमात काहीतरी वेगळं करावं असं  दिग्दर्शकाला वाटलं , म्हणून त्याने व्हिलनला डेड फुटल्या बनवलं. पण मजा येण्या ऐवजी प्रेक्षकांना जणू सजाच झाली. बाकी सिनेमातली साईड कास्ट, म्हणजे नासिर, रवीकिशन, राकुलप्रीत यांनी आपापल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. तारा सुतारीया गोड दिसली आहे पण तिला अभिनयाला इतका स्कोप दिलेला नाही. सिनेमातला सगळा फोकस आहे तो रघु आणि विष्णूवर ! एक्शन बरोबर सिद्धार्थने अभिनयाकडे ही लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं.

एकूणच सिनेमा कथा, दिग्दर्शन, अभिनय, डायलॉग्स या सगळ्याच बाबतीत निराश करतो. सिनेमा बघितल्यावर, मरजावा’ ने मार डाला असंच म्हणावं  लागले.

– प्राची पाखरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...