Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन मराठीतील रंजक कथानकाचे हे वेबशो आणि वेबसीरीज तुम्ही पहिले आहेत का ?

मराठीतील रंजक कथानकाचे हे वेबशो आणि वेबसीरीज तुम्ही पहिले आहेत का ?

Netflix ने भारतात पाय रोवताच इंग्रजी सोबत मराठी वेबसीरीज ने सुद्धा मनोरंजक कलाकृती करण्यास सुरुवात केली आहे. मराठी फक्त उत्तम नाटक आणि चित्रपटच नाही तर वेबसीरीज देखील बनवू शकते हे दाखवून दिले. सासू सुनांच्या भांडणातून बाहेर येऊन मराठी तरुणांसाठी मोकळ्या विचारांचे आणि वास्तववादी दर्शन घडविण्याचे काम या वेब शो आणि वेबसीरीज मधून केले आहे. वास्तव जगाशी सांगड घालताना त्यासोबत हास्य कल्लोळ देखील यात पाहायला मिळणार.

१. कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण

भाडीप या युट्युब चॅनलद्वारे सुरु केलेला भन्नाट आणि हास्याची मैफिल. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री आणि दिग्दर्शक अशा मंडळींना बोलवून त्यांचा यथेच्छ पाहुणचार करायचा अशी या वेब शो ची पद्धत आहे. हा प्रकार मराठीत प्रथमच सुरु झाल्यामुळे या शो ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या शो चे पहिला, दुसरा आणि तिसरा सीजन देखील आला आहे. या शो मध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी एक नसून दोन कलाकार त्यांच्या शाब्दिक विनोदातून फटकेबाजी करतात. हे दोन कलाकार म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. या दोघांनी पाहुण्यांचा केलेला पाहुणचार पाहून तुम्हाला खळखळून हसायला नक्की मिळणार. खळखळून हसण्यासाठी आवर्जून बघा कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण.

२. स्ट्रगलर साला…

कलाकारांचे आयुष्य म्हणजे अविरत कष्ट आणि मेहनत. चांगल्या कथानकात काम करायला मिळाले पाहिजे, चांगला दिग्दर्शक मिळायला हवा आणि या दोन्ही गोष्टी जुळून आल्यावर वितरक देखील तेवढ्याच ताकदीचे हवेत. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तरच त्या कलाकाराची कला जनसामान्यांपर्यंत पोहोचते. लोकांनी कौतुक केल्यावरच इतर दिग्दर्शक आणि निर्माते त्या कलाकाराला आपल्या मोठ्या सिनेमांमध्ये घेण्यास उत्सुक असतात. थोडक्यात सांगायचे तर कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल खूप आहे. हाच स्ट्रगल विजू माने यांनी आपल्या वेबसीरीज ‘स्ट्रगलर साला…’ मधून दाखविला आहे. कलाकार काम मिळविण्यासाठी काय काय करतात हे या वेब सीरीज मध्ये मजेशीर आणि विनोदातून सादर केले आहे. परंतु विजू माने यांनी वेबसीरीज वास्तव वाटावी याकरिता त्यात शिव्या अगदी ठासून भरल्या आहेत. एक रोल मिळविण्यासाठी कलाकार एकमेकांवर कशी कुरघोडी करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. कलाकारांचे आयुष्य कसे असते, ते एकमेकांशी कसे वागतात हे हसवत हसवत पाहायचे आहे तर स्ट्रग्लर साला… ही वेब सीरीज पाहायला हरकत नाही.

३. स्त्रीलिंग- पुलिंग

सध्या २१ वे शतक सुरु आहे, या २१ व्या शतकात स्त्रिया स्वतंत्र आहेत. सर्व क्षेत्रात पुरुषांच्या देखील पुढे आहेत. परंतु हा समाज स्त्रियांना अजूनही त्याच दृष्टिकोनातून पाहतो. लग्नापूर्वी मुलगी गरोदर राहिली तर हे पाप आणि कुटुंबाची प्रतिमा डागाळणारे आहे, अशा विचारांनी आपला समाज वेढलेला आहे. ही वेबसीरिज देखील अशाच कथानकाभोवती फिरते. ३ मैत्रिणी आणि यातील एक गरोदर राहते, मुलाला जन्म द्यायचा की नाही पण त्या बाळाचा बाप कोण आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या ३ मैत्रिणींचा प्रवास सुरु होतो. हा प्रवास काही मजेशीर, काही गांभीर्याचा आणि उत्सुकता वाढविणारा आहे. शेवट काय होणार हे पाहण्यासाठी नक्की पाहा.

४. मुवींग आऊट

स्त्रीलिंग-पुलिंग मध्ये आपण समाजाची स्त्रियांबद्दलची विचारसरणी बद्दल पाहिले. या वेबसीरिज मध्ये स्त्रियांच्या मोकळीकतेबद्दल विषय मांडला आहे. परंतु एक अशी मुलगी पाहणार आहोत ज्या मुलीला घरातल्यांचा लग्न-लग्न या विचारला कंटाळा आला आहे आणि तिला या सर्व पसाऱ्यापासून दूर जायचे आहे, परंतु दूर जाऊन काय करायचे कसे राहायचे आणि पुढे काय होणार या सर्वच बाबतींमध्ये गोंधळून गेलेल्या मुलीचा प्रवास. तिच्या या एकट्या प्रवासात काय काय होते, तिला कोण कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. ती शोधत आहे तास जोडीदार मिळतो का ? हे पाहण्यासाठी वेबसीरिज पाहायला हवी.

वेबसीरिजच्या युगात इंग्लिश आणि हिंदीच्या सोबत मराठी पदार्पण करुन तोडीस तोड असे कलाकृतीचे प्रदर्शन दाखवून आपला ठसा उमटविला आहे. उत्तम कलाकृती आणि ताकदीचे कथानक मराठीने सादर केले आहे. इतकेच नव्हे तर या वेब शो आणि वेबसीरिज मध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी देखील उत्तम काम केले आहे, त्यामुळे त्यांचे देखील कौतुक करायला हवे. नेटकऱ्यांना मराठीने दिलेली कलाकृती हिंदी आणि इंग्रजीशी तुलना करु पाहता ही कलाकृती दर्जेदार आहे की नाही, नेमके कथानक किती ताकदीचे आहे याची चाचणी करण्यासाठी आवर्जून पाहा वरील मराठी वेब शो आणि वेबसीरिज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...