Thursday, October 22, 2020
Home मनोरंजन अगोड मोतीचूर !

अगोड मोतीचूर !

नवाजजुद्दीन सिद्दकी म्हटलं की गन्स , मारामारी थरार नाट्य असं जणू समीकरण गेली इतकी वर्षं आपण बघत आलोय. हाच स्टीरोयोटाईप नवाजला तोडायचा होता आणि म्हणूनच त्याने हा कॉमेडी फॅमिली सिनेमा करायचं ठरवलं. एक वय वाढलेला तरुण पुष्पेंदर त्यागी (नवाजुद्दीन सिद्दकी) आणि लग्न झाल्यावर परदेशी जाण्याची स्वप्ने पहाणारी ऍनी (अथिया शेट्टी), या काहीशा विजोड वाटणाऱ्या जोडीची ही प्रेमकथा आहे.

‘मोतीचूर चकनाचूर’ ची लेखिका आणि दिग्दर्शिका देवमित्र बिस्वालचा आहे. जिचा हा डेब्यू सिनेमा आहे.

आजकाल प्रेक्षकांना देसी सिनेमे आवडू लागले आहेत. म्हणजे छोट्या शहरांमध्ये घडणाऱ्या कथा. ही कथा भोपाळमध्ये घडते. तिथली भाषा, पेहराव, आस पासचं वातावरण, कुटुंब आणि लोकांची मानसिकता, परंपरा आणि प्रथा, या सगळ्या गोष्टींची छान मांडणी सिनेमात केली आहे. हे सगळं अभिनयातून साकारणं नवाजसाठी काही अवघड नव्हतंच पण सरप्राइजिंगली अथिया शेट्टीने हा बाज चांगला पेलला आहे. पहिल्यांदाच तिने एका देसी मुलीची भूमिका साकारली आहे, त्यामुळे नवाजच्या तोडीस तोड भाषेत बोलणं हे तिने जमवलं आहे.

आईच्या प्रचंड धाकात असणारा हा वय वाढलेला ३६ वर्षांचा मुलगा आहे जो लग्न या विषयाला घेऊन इतका वैतागला आहे की त्याला आता कोणत्या ही मुलीशी लग्न केलं तरी चालणार असतं. दुसरीकडे आहे ऍनी जी थोडी फटकळ असल्यामुळे तिला अमेरिका, युरोपनंतर आता सिंगापूरचीही स्थळे मिळेनाशी होतात. तेव्हा ती या दुबईवाल्याकडे वळते. पुष्पेंदर सोबत दुबईला जायला मिळेल म्हणून लग्न करण्यास भाग पाडते. त्यानंतर त्या दोघांचे हे नातं कोण कोणत्या परिस्थितून आणि परीक्षा देत जातं त्याचीच ही कथा आहे. लपवालपवी , गुंतागुन आणि कन्फ्युजन या गोष्टींमध्ये अडकणार ही हलकी फुलकी प्रेम कथा आहे. सपोर्टिंग कास्ट सुद्धा उत्तम आहे . पण इंटरव्हल नंतर सिनेमा , कथेतल्या गुंतागुंती मुळे बोर वाटतो . नवीन पिढीच्या दृष्टीने हुंडा देणे आणि घेणे याबद्दलची काय मते आहेत याची चर्चा होते. परंतु त्याचा पूर्ण शोध, त्याचे सगळे पैलू आणि त्याची सगळी खोली या चित्रपटाला घेता आलेली नाही. असो पण हा दिगदर्शिकेचा पहिला सिनेमा आहे. ही एक टिपिकल प्रेमकथा नसली तरी ती अखेर प्रेमाच्या दिशेने वळते आणि खरं नातं काय असतं, माणसाचं खरं महत्त्व काय, आदी पारंपरिक पद्धतीची टिपणी करत शेवटाला जातो.

सिनेमाला जी काहीथोडी थोडी गर्दी जमते, ते नक्कीच नवाज फॅन्स आहेत . नवाज कडून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल या अपेक्षेने. तेवढीच अपेक्षा तुम्हीही ठेवली तर हा सिनेमा बरा आहे . बाकी फार अपेक्षा बाळगू नका !

– प्राची पाखरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...