Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन पानिपत: द ग्रेट बिट्रेयल

पानिपत: द ग्रेट बिट्रेयल

अंगावर काटा आणणारा पानिपतचा ट्रेलर सध्या चर्चेत आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून पिरियॉडिक सिनेमांना चांगलं यश मिळू लागलंय. बाजीराव मस्तानी, पद्मावत, अशा विषयांच्या सिनेमांना लोक पसंत करू लागले आहेत. आणि आता निर्माता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, जोधा अकबर नंतर पानिपत हा सिनेमा घेऊन येत आहे. राजे महाराजे, महाल, युद्ध, अलंकारिक भाषा आणि सिनेमाला एक क्लासिक टच यामुळे सिनेमाचं वैभव अधिकच बहारदार होतं आणि आपोआपच प्रेक्षक चित्रपटगृहाकडे खेचला जातो. नवीन पिढी समोर चित्रपटाच्या माध्यमातून मराठ्यांची ही शौरगाथा प्रस्तुत करणं आव्हान आहे. इतिहास योग्यरित्या चित्रपटातून मांडणं आणि ते देखील कोणतीही कॉंट्रोव्हर्सी न होता हे खरंच जोखमीचं काम आहे. काही वर्षांपूर्वी, संजय लीला भन्साळीला पद्मावत सिनेमासाठी ना ना प्रकारच्या अडथळ्यातून जावं लागलं. पेशव्यांची ही वीरगाथा साकारणारा निर्माता दिग्दर्शक मराठमोळा आशुतोष गोवारीकरच आहे. मुळात अभ्यासू वृत्तीचा हा दिग्दर्शक अद्याप तरी कोणत्याच कॉंट्रोव्हर्सीच्या कचाट्यात सापडलेला नाही.

कधी ऍव्हरेज कधी फ्लॉप सिनेमा देणारा अर्जुन कपूर या सिनेमात खूप प्रॉमिसिंग दिसतोय. सिनेमात ग्लॅमरला आणखीन खुलवण्याचं काम करते क्रिती सनन तर सिनेमाचं मुख्य आकर्षण ठरतोय अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारणारा संजय दत्त. ट्रेलर मधला त्याचा लुक आणि त्याच्या प्रेजन्सने खूपच वाह वाह मिळवली आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

हल्ली आपण म्हणतो कन्टेन्ट इज किंग. तर पानिपतच्या इतिहासाचा नेमका कन्टेन्ट काय आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे दिल्लीच्या उत्तरेस सुमारे ९७ किमी अंतरावर उत्तरेत, मराठा साम्राज्याच्या एका उत्तरी मोहीम दरम्यान या युद्धाचा सुरुंग पेटला. हे युद्ध अफगाणिस्तानचा अब्दाली आणि नजीब–उद-दौला यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची बादशाही टिकवण्यासाठी मराठ्यांबरोबर युद्ध झाले. ही लढाई १८ व्या शतकात लढलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या युद्ध घटनांपैकी एक मानली जाते.

१७३४ च्या अहमदिया करारानंतर ती मराठ्यांकडे आली. त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथाई कर आणि सरदेशमुखीचा हक्क मिळाला. हीच बाब काही राजपूत राजांना टोचत होती. अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला, तर त्यांनाही ते हवंच होतं. हिंदुपदपातशाहीच्या रक्षणासाठी पेशव्यांनी ही मोहीम आखल्याचं ऐतिहासिक दाखल्यांमधून स्पष्ट होतं.

सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी ४५,००० ते ६०,००० दरम्यान सैन्य एकत्र केले. सुमारे २,००,००० यात्रेकरूंचा भार सांभाळत भाऊंनी उत्तरेत कूच केली. त्यातील बहुतेक यात्रेकरू ते उत्तर भारतात हिंदू पवित्र स्थळांच्या यात्रेसाठी उत्सुक होते. हेच यात्रेकरूंचे ओझे पानिपत युद्धात मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

युद्धात सदाशिवराव भाऊ यांनी आपली मधील बाजु ढासळताना दिसत असल्याने आणि विश्वासराव लढाईत धारातिर्थी पडले होते. त्यामुळे सदाशिवराव हत्तीवरून उतरून स्वतः मैदानावर लढू लागले. विश्वासराव आधीच डोक्यावर गोळी लागून मृत्युमुखी पडले होते. विश्वासरावांच्या पडण्याने मराठा सैन्य गळून पडले, तरीही भाऊ आणि त्यांचे निष्ठावंत अंगरक्षक अखेरीपर्यंत लढा देत राहिले. भाऊंनी आपले युद्धकौशल्य दाखवत अनेक अफगाणांना गारद करत युद्धभूमीत जीव सोडला. युद्धामध्ये ३०,००० ते ४०,००० लढाऊ लोक मारले गेले लढाईनंतर आणखी ४०,००० – ७०,००० लोकांना कैद करून मारण्यात आले.

पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी १२ वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी १७७३-७४ मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.

इतिहासातला हा थरार चित्रपटगृहात अनुभवणं नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.

प्राची पाखरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...