Wednesday, October 21, 2020
Home इतर अफगाणिस्तानचा जॉर्ज वॉशिंग्टन

अफगाणिस्तानचा जॉर्ज वॉशिंग्टन

अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची ही गोष्ट आहे ३०० वर्षांपूर्वीची. अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या योद्ध्याचे नाव आहे, मीर वाईज होतक. यांनी अशी घटना घडवून आणली की ज्यामुळे भारत उपमहाद्वीप आणि पर्शियाचा इतिहास बदलून गेला. पर्शियन साम्रज्याच्या पारतंत्र्यातून मुक्त करुन त्यांनी त्यांच्या शहराला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी पर्शियन सत्ताधारी त्यांच्या प्रजेतील मुसलमानांना सुन्नी मधून सिया मध्ये रूपांतरित करत होते. मीर वाईज होतक जे पाश्तूनमधील घिलजी समाजाचे प्रमुख होते, यांनी पर्शियाच्या दबावातून शहराला मुक्त केले. यामुळे त्यांना अफगाणिस्तानचे जॉर्ज वाशिंग्टन म्हणून संबोधिले जाते.

अफगाणिस्तानचा पूर्वाध आणि सफविद साम्राज्य

या इतिहासाची सुरुवात १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. सध्याचा अफगाणिस्तान २०० वर्षांपूर्वीच विभागला होता. भारतीय उपमहाद्वीप आणि पर्शिया मध्ये मुघल आणि सफविद साम्रज्याने वर्चस्व प्रस्थापित केले होते. तिसरे राज्य म्हणजे अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील मजर-ए-शरीफ जवळील बुखाराचे उजबेक खनाते ज्यावर शासन प्रस्थापित होते. काबूलचा कारभार मुघलांकडे तर हेरतचा कारभार सफविद साम्रज्याकडे होता. कंधार मधील सफविद प्रशासकांनी त्यांच्या फायद्यासाठी पाश्तून मधील स्थानिक समाजांसोबत हात-मिळविणी केली होती. या शहराला आर्थिक आणि राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्व होते. कारण हे शहर पर्शिया आणि उपमहाद्वीप यांच्या मार्गातील मुख्य लष्कर आणि व्यापाराचे महत्वाचे ठिकाण होते. १७०० सालापासून ५० वर्षापर्यंत कंधार राज्य सफविद साम्राजामध्ये होते.

सफविद साम्रज्यात सर्वकाही आलबेल नाही राहिले. सफविद साम्राज्याच्या २०० वर्षाच्या काळात त्यांनी सुन्नी मुस्लिमांना सिया करण्यात बहुतांशी यशस्वी झाले होते. परंतु अफगाणिस्तानमध्ये फक्त तोपर्यंतच शांतता होती जोपर्यंत सफविद साम्र्याज्याचा गादीवर शाह सुलतान हुसेन बसला नव्हता. शाह सुलतान हुसेन हा १६९४ मध्ये सफविद साम्राज्याचा सुलतान झाला. शाह सुलतान हुसेन हा व्यसनाच्या आहारी गेलेला उन्मत्त प्रशासक होता. त्याने साम्राज्यातील सुन्नी पंथीयांवर सिया पंथात प्रवेश करण्यासाठी अमानुष छळ केला.

ढसाळ प्रशासना विरोधात मीर वाईज होतक यांनी प्रखर केला आवाज

कंधारमधील परिस्थितीमध्ये तणाव वाढत गेला. १७०४ मध्ये कंधारचे राज्यपाल गुरुगीन खान यांची नियुक्ती केली गेली. गुरुगीन खान मूळचे जॉर्जियन परंतु त्यांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केला. पाश्तून मधील घिलजी समाजावर त्यांनी चुकीचे नियम लादून त्यांना सिया पंथात रूपांतर करण्यासाठी अधिक दबाव टाकला. परंतु या घिलजी समाजाचे प्रमुख मीर वाईज होतक यांच्या विरोधामुळे गुरूगीन खान अयशस्वी ठरले. त्यामुळे त्यांनी मीर वीज होतक यांना अटक केली आणि पर्शियाची राजधानी इस्फाहान येथे पाठविले. ज्यामुळे सुलतान शाह आणि मीर वाईज होतक यांच्यात मैत्री संबंध प्रस्थापित व्हावे.

उन्मत्त राजाच्या बेफिकीर कारभारामुळे जनतेला केले आवाहन

इस्फाहान मध्ये गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की सुलतान शाहच्या ढसाळ प्रशासनामुळे लष्कर, प्रशासकीय आणि न्यायव्यवसंस्थेच्या कारभाराला सुरुंग लागला होता. सुलतान शाहचे प्रशासनात मुळीच लक्ष नव्हते. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी मक्कामध्ये प्रश्न उपस्थित केला की ,” सिया पंथाचे प्रशासक उन्मत्त आणि अमानुष छळ करणारे प्रशासक आहेत, जर बिकट परिस्थिती उद्भवली तर आपण सुन्नी पंथीयायांनी त्यांना न जुमानता त्यांचा कडाडून विरोध करून त्यांची सत्ता उलथायलं हवी. ” त्यांच्या या वक्तव्यामुळे साम्राजाबद्दल त्यांच्या समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ते कंधारला परतल्यावर गुरुगीन खान यांचा एप्रिल १७०९ मध्ये मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल असे म्हटले जाते की हा घडवून आणला होता.

अफगाणिस्तानच्या निर्मितीचा पूर्वार्ध

यानंतर मीर वाईज होतक यांना कंधारचे राजा आणि राष्ट्रीय सैन्यदलाचे जनरल म्हणून घोषित करण्यात आले. परंतु त्यांनी स्वतःला राजा मानण्यास नकार दिला होता. पर्शियन सैन्य दलाने अनेक आक्रमणे केल्यानंतर कंधार परत मिळविले, परंतु तोपर्यंत मीर वाईज होतक यांनी स्वतंत्र अफगाणची स्थापना केली होती. यात कंधार ( म्हणजेच दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तान). या स्थापनेत सध्याच्या अफगाणिस्तानची बीजे रोवली होती. या नंतर अहमद शाह दुरानी याने १७४७ मध्ये साम्राज्य वाढवून अफगाणचा अफगाणिस्तानची पुनर्स्थापना केली.

होतक साम्रज्याचा उदय आणि अस्त

मीर वाईज होतक यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मुहम्मद होतक याने स्वतःला होतक साम्राज्याचा राजा घोषित केला आणि इराणवर हल्ला केला. १७२२ मध्ये पर्शियन सैन्याला हरवले आणि सुलतान शाह हुसेन यांनी शरणागती पत्करली. यानंतर मुहम्मद होतक याचा राज्याभिषेक केला आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मुहम्मद होतक याने तुर्क आणि रशियावर आक्रमण केले. परंतु यामध्ये त्याला हार पत्कारावी लागली आणि यातच मृत्यू झाला.

मीर वाईज होतक यांच्या उद्रेकाने सुरु झालेल्या वादळामुळे होतक साम्रज्याची निर्मिती झाली. घिलजी समाजाच्या प्रमुखाने उद्रेक करुन अफगाण आणि त्यानंतर होतक साम्राज्य उभे केले. त्यांच्या या पराक्रमाला मीर वाईज होतक यांना अफगाणिस्तानचे जॉर्ज वॉशिंग्टन म्हणून संबोधिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...