Thursday, October 22, 2020
Home माहितीचा पूर रयतेचे राजे छ.शाहू महाराज- यांच्याबद्दल माहित नसलेल्या महत्वपूर्ण गोष्टी

रयतेचे राजे छ.शाहू महाराज- यांच्याबद्दल माहित नसलेल्या महत्वपूर्ण गोष्टी

शाहू महाराज म्हणजेच भोसले राज घराण्याचे वारस. भोसले घराणे म्हणजे स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि मराठ्यांचे साम्राज्य उभारणाऱ्या शिवाजी महाराजांचे घराणे. याव्यतिरिक्त शाहू महाराजांनी रयतेचा राजा म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. आज २६ जून शाहू महाराजांचा जन्मदिवस. आज आपण शाहू महाराजांबद्दल काही महत्वपूर्ण परंतु माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

१. भोसले घराण्याचे शाहू महाराज दत्तक पुत्र होते

छ.शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. कोल्हापूर संस्थानातील जनतेकरिता त्यांनी आयुष्य वाहिले. बहुतांश लोकांचा असा समज आहे छ. शाहू महाराज हे संभाजीचे वारस पुत्र आहेत. छ. शाहू महाराज हे दत्तक पुत्र होते. शाहू महाराजांचे मूळचे नाव यशवंतराव घाटगे होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना चौथा शिवाजी यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले होते. १८९४ साली त्यांना राजगादीवर बसविण्यात आले, तेव्हा त्यांचे नाव छ. शाहू महाराज असे ठेवण्यात आले. छ. शाहू महाराजांनी अनेक समाजकार्य केली. समाजातील दुर्बल घटकांचा विकास व्हावा याकरिता त्यांनी अनेक शिक्षणसंस्था उभारल्या.

२. डॉ. आंबेडकरांचे प्रेरणास्थान होते छ. शाहू महाराज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दुर्बल घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा छ. शाहू महाराजांच्या कार्यातून मिळाली. त्यांच्या या स्वभावामुळे छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये घनिष्ठ नाते होते. छ. शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी समजतील दुर्बल घटक म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी भारतीय संविधानात अनुच्छेद ४६ समाविष्ट केला. या अनुच्छेदात असे नमूद केले होते की, समाजातील दुर्बल घटकांमध्ये येणाऱ्या लोकांना म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातींकरिता राज्य शिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यासोबत त्यांना सामाजिक न्याय आणि सामाजिक शोषणाच्या सर्व प्रकारापासून संरक्षण देईल.

३. छ. शाहू महाराजांनी आरक्षणाबाबतीत दिली उत्तम समज

छ. शाहू महाराजांनी बहुजन समाजाकरिता १९०२ साली ५०% आरक्षण जाहीर केले होते. त्यांच्या फतव्या वरुन सांगली संस्थांचे कारकून वकील गणपत अभ्यंकर यांनी विरोध केला. विरोध दर्शविण्याकरिता ते छ. शाहू महाराजांना भेटण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झाले. महाराजांनी त्यांचे आदरातिथ्य स्वागत केले. त्यानंतर त्यांनी गणपत अभ्यंकर यांना घोड्यांच्या तबेल्याजवळील मैदानात बोलावले. तबेल्यामध्ये प्रत्यके घोड्याला हरभरा खाण्यासाठी वेगळी सोय होती. नोकराला सांगून त्यांनी घोड्यांसाठी मैदानामध्ये एकाच ठिकाणी हरभरा ठेवला आणि बांधलेल्या घोडयांना मोकळे केले. यामुळे जे ताकदीने सशक्त घोडे होते त्यांनी इतरांना बाजूला करत हरभरा मिळविला, परंतु जे दुर्बल घोडे होते त्यांनी बाजूला रहाणे पसंत केले. हे उदाहरण दाखवा त्यांनी अभ्यंकरांना विचारले ‘अभ्यंकर मी या दुर्बल घोड्यांचे काय करु, त्यांना सोडून देऊ की गोळी मारु. म्हणून मी या घोडयांना बांधून हरभरा खाऊ देत होतो, जेणेकरुन ते एकमेकांच्या खाण्यामध्ये तोंड घालू नयेत. यालाच म्हणतात आरक्षण. अभ्यंकर जाती माणसांमध्ये नाही तर प्राण्यांमध्ये असतात. परंतु तुम्ही लोकांनी प्राण्यांच्या पद्धती माणसांमध्ये आणलीत, म्हणून प्राण्यांची पद्धत माणसांमध्ये सादर केली.’ अभ्यंकरांकडे यावर एकही उत्तर नव्हते.

४. दुसऱ्या क्रमांकाचे राधानगरी धरण छ. शाहू महाराजांनी उभारले

छ. शाहू महाराजांनी २८ वर्षे गादीवर होते. या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक समाजकार्य केली. त्यातील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी राधानगरी धरण उभारले. महाराजांनी हे धारण उभारण्याचा निश्चय १९०७ साली केला तेव्हा राधानगरी धरण हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण उभे राहणार होते. १९०९ साली या धरणाचा पाय रोवला गेला. या धरणाचे बांधकाम १९३५ साली पूर्ण झाले आणि १९३८ साली या धरणातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. शाहू महाराजांनी भविष्याचा विचार राधानगरी धरणाची उभारणी केली. त्याकाळी असा विचार करणारे ते पहिले राजा होते. राधानगरी धरण उभारणे हे शाहू महाराजांच्या जीवनातील ध्येय होते असे त्यांनी नमूद केले होते. हे धरण सिंचनासाठी तसेच औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त ठरले. या धरणाच्या बांधणीदरम्यान महाराज बेंझार राजवाड्यात राहत होते. या धरणाच्या बांधकामासाठी महाराजांनी त्यांचा हा राजवाडा जमीनदोस्त केला. छ. शाहू महाराजांना रयतेचा राजा का म्हणतात हे या कारणावरून दिसून येते.

५. तिसरी पास व्यक्तीला कायद्याचे शिक्षण घेण्याची परवानगी दिली

महाराजांनी जनतेतील व्यक्ती भेदभाव न करता सगळ्यांना सामान वागणूक दिली. त्यांनी समाजात रूढ असलेली अस्पृश्यता कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याकाळी उच्च पदांवर ब्राम्हण व्यक्तींची नेमणूक केली जात असे. कमी जातींच्या व्यक्तींना उच्च पदावर नेमले जात नसे. शाहू महाराजांनी हि पद्धत मोडून काढली. शाहू महाराजांनी तिसरी पास व्यक्तीला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सनद दिली. मातंग समाजातील तुकारामबुवा गणेशाचार्य या व्यक्तीला महाराजांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. महाराजांच्या या निर्णयाने अनेक ब्राह्मणांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी या विरोधात महाराजांकडे खेद व्यक्त केला. यावर महाराजांनी ब्राह्मणांना अगदी उत्कृष्ट उत्तर देत म्हणाले,’तुम्ही तुमची याचिका त्याच्याजवळ घेऊन जाऊ नका.’ तिसरी पास मातंग समाजातील व्यक्तीला कायद्याचे शिक्षण देऊन उच्च पदावर बसविले हे त्याच्या उच्च अधिकाऱ्यांना रुचले नाही. त्यांनी तुकारामबुवा यांना पदावर काढून टाकण्यात यावे यासाठी महाराजांकडे त्यांच्या बद्दल खोट्या तक्रारी केल्या की, तुकारामबुवा काम करण्यात अनेक चुका करतात त्यांचा महिन्याभराचा पगार कापण्यात यावा. या प्रकराबद्दल महाराजांना कळाले यावर त्यांनी तुकारामांच्या उच्च अधिकाऱ्याला पात्र लिहिले की तुकारामबुवा कामामध्ये १५ दिवसांत प्रवीण झाले नाही तर तुमचा १५ दिवसाचा पागा कापण्यात येईल. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने तुकारामबुवा उत्तमरित्या काम करतात असे महाराजांना निरोप दिला.

छ. शाहू महाराजांनी समाजामध्ये दुर्बल घटकांचा विकास व्हावा आणि समाजात समानता प्रस्थापित निर्माण व्हावी यासाठी अनेक समाजकार्य केली. रयतेच्या विकासाची आणि कल्याणाची योग्य जाण असणारा राजा म्हणजेच रयतेचा राजा म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...