Thursday, October 22, 2020
Home माहितीचा पूर विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

सध्या महाराष्ट्राचे राजकारण हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजप एकत्रित येऊन सरकार बनवतील असे वाटणारे सहज सोपे समीकरण गुंतागुंतीचे झाले आणि महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली, त्यामुळे वाटले हा प्रश्न सुटणार परंतु ते देखील शक्य झाले नाही. तब्बल २०-२२ दिवस उलटून गेले होते तरी देखील त्यांच्या बैठकीत निर्णय निकाली लागला नाही. अखेरीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार यावर मोहोर लागली. परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी अजित पवारांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राजकारणात नवीन पेच उभा केला.

या विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष यांनी कोर्टात धाव घेतली. या पक्षांचे आमदार भाजपच्या गळाला लागू नये म्हणून बहुमत चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी. आज सकाळी कोर्टाने निर्णय दिला की, सत्ता पेचाचा प्रश्न सोडविण्यासाठी बहुमत चाचणी उद्या घेण्यात यावी. या बहुमत चाचणीद्वारे ठरविण्यात येणार की महाराष्ट्रात फडणवीस सरकार राहणार की शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार येणार. परंतु उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी विधानसभा हंगामी अध्यक्षाची निवड करणे गरजेचे आहे. या विश्वासदर्शक ठरावात हंगामी अध्यक्षाची भूमिका महत्वाची आहे का? हंगामी अध्यक्षाची निवड कशी केली जाते? चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे काय आहेत.

विधानसभा हंगामी अध्यक्ष

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे मर्यादित कालावधी करीता विधानसभेचा कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात येते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सभापती आणि उपसभापतीची निवड न झालेली असल्यामुळे त्यांच्याऐवजी हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात येते.

विधानसभा हंगामी अध्यक्षाची निवड कोण करतात

विधानसभा हंगामी अध्यक्षाची निवड करारानुसार विधानसभा सदस्यांद्वारे करण्यात येते. हंगामी अध्यक्षाकरीता पात्र उमेदवार विधानसभेतील वरिष्ठ सदस्य असणे आवश्यक आहे. निवडलेला हंगामी अध्यक्ष मर्यादित कालावधीसाठी विधानसभेच्या कामकाजाबद्दल निर्णय घेतात.

हंगामी अध्यक्षाची कामे

मर्यादित कालावधीसाठी नियुक्त झालेले हंगामी अध्यक्षाचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे, विधानसभेचे नव-निर्वाचित सभासदांची शपथविधी करुन घेणे. हंगामी अध्यक्ष विश्वासदर्शक ठराव घेण्याचे महत्वाचे काम देखील करतो. हंगामी अध्यक्षाला सभापती निवड करण्याचा अधिकार देखील असतो. सभापतीची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...