Thursday, October 22, 2020
Home माहितीचा पूर या रोजच्या सवयींमुळे तुम्हाला हा भयंकर रोग होऊ शकतो !

या रोजच्या सवयींमुळे तुम्हाला हा भयंकर रोग होऊ शकतो !

सध्याच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कामाच्या ओझ्यामुळे योग्य आहार, पुरेशी झोप या गोष्टींच्या वेळेचे गणित चुकत आहे. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होत आहे, याची जाणीव वेळीच होत नाही.

१. पुरेशी झोप न घेणे

आजचे युग म्हणजे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. या डिजिटल युगात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी चॅट किंवा व्हिडीओ कॉल करू शकतो. परंतु याच डिजिटल तंत्रज्ञानामुळे माणूस रात्री खूप उशिरापर्यंत जागे राहतात. त्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. निरोगी राहण्यासाठी किमान ६-७ तास झोप मिळणे आवश्यक आहे. जुन्या काळात एक म्हण प्रसिद्ध आहे ती म्हणजे ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी धन-धान्य आरोग्य लाभे’. ही म्हण निरोगी आरोग्यासाठी तंतोतंत लागू होते. म्हणून कायम लक्षात ठेवा मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर पुरेशी झोप आवर्जून घ्या, अन्यथा तुम्ही मधुमेहाच्या विळख्यात केव्हा अडकणार हे देखील कळणार नाही.

२. व्यायाम न करणे

सध्याचे जीवन हे धकाधकीचे जीवन म्हणून सर्वश्रुत आहे. या धकाधकीच्या जीवनात काही मिनिटे व्यायामासाठी देता येणे शक्य नाही. सकाळी धावपळत ऑफिस गाठणे आणि त्यानंतर थकून सायंकाळी घरी परतल्यावर उशिरा झोपणे हा बहुतांश नोकरदारांचा दिनक्रम ठरला आहे. व्यायाम न करण्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंच्या पेशी इन्सुलिनच्या बाबतीत कमी संवेदनशील होतात. इन्सुलिनवरील नियंत्रण कमी झाल्यामुळे डायबिटीजचा धोका अधिक बळावतो. त्यामुळे सकाळी किमान ३० मिनिटे व्यायाम करायला मुळीच कंटाळा करू नका.

३. मासे खाणे टाळणे

डायबिटीजचा धोका वाढण्याचे आहाराबाबतीत मुख्य कारण म्हणजे मासे खाणे टाळणे. बहुतांश व्यक्ती मासे खाण्याऐवजी चिकन किंवा मटण खाणे पसंत करतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर चिकन किंवा मटण खाण्याऐवजी मासे खाणे फायदेशीर ठरते. कारण मास्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. मास्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक असते. मासे खाण्याने इन्सुलिनवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे आठवड्यातून २ वेळा मासे खाण्याने डायबिटीज दूर ठेवता येऊ शकते.

४. सकाळचा नाश्ता न करणे

जुन्या पिढीच्या तुलनेत सध्याची पिढी सकाळच्या न्याहारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. तसेच पूर्वीच्या जीवनशैलीच्या तुलनेत सध्याची जीवनशैली ही कमी मेहनतीची झाली आहे. सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार मानले जातो. आहारतज्ञांचे असे ठाम मत आहे की, सकाळचा नाश्ता हा इतर दिवसाच्या आहाराच्या तुलनेत अधिक करावा. त्यानंतरचे जेवण कमी आणि रात्रीचे जेवण अत्यल्प करावे. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात पूर्ण उलट आहारचक्र सुरु आहे. सकाळचा नाश्ता वगळून दुपारचे जेवण संध्याकाळी नाश्ता आणि रात्रीचे अधिक जेवण असा चुकीचा आहार केला जातो. याचाउलट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. दुपारच्या जेवणापर्यंत काहीही न खाण्याने इन्सुलिनच्या प्रमाणावर आणि रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होतो. बहुतांश डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढण्यामागे

५. आहारात भाज्या खाणे टाळणे

नियमित संतुलित आहार करणे हे निरोगी आयुष्याचे गमक आहे. भाज्या आहारात घेतल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात. या पोषक तत्त्वांमुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण अचानक वाढत नाही. इन्सुलिनच्या प्रमाणात वाढ होण्याने डायबिटीजचा धोका बळावतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात भाज्यांचा समावेश नक्की करा.

भारतातील ३० ते ४० टक्के लोक डायबिटीज या महाभयंकर आजाराच्या विळख्यात आले आहेत. डायबिटीज हा आजार झाल्यनाने इतर सर्व आजारांना आपसूकच निमंत्रण मिळते. म्हणून जर तुम्हाला डायबिटीज पासून दूर राहायचे असेल तर वरील गोष्टी मुळीच टाळू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...