Thursday, October 22, 2020

ते लेक्चर

ते लेक्चर कधी संपूच नये, असं वाटतं.
जेव्हा ती तिकडे समोर,अन मी इकडे असं दृश्य असतं.
मास्तरची बडबड, चालतच राहते.
माझे डोळे मास्तरकडे, पण नजर मात्र तिकडेच असते.

मधूनच तिच्या डोळ्यांवरती पडणाऱ्या, केसांकडे लक्ष जातं.
तिचा त्यावेळचा चेहरा पाहून, मन अगदी मंत्रमुग्ध होतं.
असाच पूर्ण होतो, त्या लेक्चरचा प्रवास.
मास्तर आणि मास्तरच्या शिकवण्याचा होतो मनाला त्रास.

जेव्हा जोराची घंटा वाजते, दचकून मी जागा होतो,
अन अटेन्डन्स देऊन, पुढच्या लेक्चरची पुन्हा वाट पाहतो.
पुन्हा वाट पाहतो. कारण,
ते लेक्चर कधी संपूच नये, असं वाटतं.

Nagesh Kulkarni
Nagesh Kulkarni
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मास मिडिया डिप्लोमा होल्डर, फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसह लेखनाची विशेष आवड आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग लेखन करताना चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाण करण्याची सवय आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तसेच कविता ही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...