Wednesday, October 21, 2020
Home Tech मूड गोष्ट प्रणय G. मुजिशिअन्स अँड बॅंड मुंबईची....

गोष्ट प्रणय G. मुजिशिअन्स अँड बॅंड मुंबईची….


आयुष्यात नेहमी आपलं करियर घडवतांना आपल्या छंदांना कुठेतरी बाजूला सारून जीवनाच्या शर्यतीत प्रवाह नुसार वाहावं लागत परंतु कुठेतरी मनात ती इच्छा असतेच ती म्हणजे छंदाला जोपासण्याची…परंतु जर त्याच छंदाला आपण करियर म्हणून निवडले तर…! गोष्ट जरा हटके आहे पण तेवढीच,खरी सुद्धा चला तर जाणून घेऊयात नव्या “मॅशप बॅन्ड” ची गोष्ट…!

प्रणय गोमाशे, रोहन झोडगे आणि नयन/स्वप्निल मोरे या मित्रांनी 3 वर्ष आधी एक PRANAY G. हा unplugged music Band बनवला ज्यामध्ये मुंबईच्या इतर स्थानिक कलाकारांनी मिळून मराठी, हिंदी, वेस्टर्न, संगीताच्या वेगवेगळ्या तर्हा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सुरु केला. जुण्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर त्यांच्या बॅन्डला युनिक बनवतो, म्हणूनच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव संगीत संच आहे.


संध्यावत मुंबईमधील असे कोणतेच व्यासपीठ नाही जिथे ह्या बॅंडने सादरीकरण केले नसेल, संपूर्ण मुंबईतच नवे तर विदर्भातील अनेक शहरात, महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, देशातील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या पुढे गाण्याची संधी त्यांना मिळाली. गोवा सरकार आयोजित “गोवा महोत्सव” मध्ये सुद्धा यांनी प्रसिद्धी मिळवलीयं अश्या अनेक मेट्रो शहरात यांची हॉउसफ़ुल्ल कार्यक्रम आजवर झालेली आहेत, प्रामुख्याने या म्युझिक बॅंडला जागतिक स्तरावरच्या ”हार्ड रॉक कॅफे”मध्ये पाचारण करण्यात आले. हार्ड रॉक कॅफे हे संपूर्ण जगात म्युझिक कॅफेसाठी प्रसिद्ध असून संगीतातल्या दिग्गजांनी ह्या व्यासपीठावरून प्रसिद्धी मिळवली आहे. आपण ज्या सेलेब्रिटींना प्रसारमाध्यमात बघत असतो अश्या बऱ्याच दिगज्जांनी ह्यांच्या बॅंडला भेट दिलीयं, MTV FLYP, THE FINCH या सारख्या अमेरिकन व्यासपीठावर सुद्धा आपली छाप सोडली आहे. नुकताच “बोलावा विठ्ठल” हा अभंग व गीतसंगीताचा कार्यक्रम अत्रे रंगमंदिर कल्याण येथे हाउसफुल पार पडला. पारंपारिक अभंग, भक्तीगीते,बंदिशी इ. ना नव्याने सादर करून लोकांकडून उत्कृष्ट अशी दाद मिळवली. अभिजात संगीताला नव्याने साज चढवून पुढच्या पिढीला ते वारसा म्हणून जपण्यासाठी बॅन्ड चा प्रामाणिक प्रयत्न आहे.

PRANAY G बॅंडचे मुख्य गायक ”प्रणय रमेशराव गोमाशे” हे मूळचे विदर्भातील चंद्रपूरचे असून स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले, त्या दरम्यान ते नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे पुढे संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली, पुढे मुंबई विद्यापीठ संगीत विभाग माजी विद्यापीठ प्रमुख व जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक पंडित मुरलीमनोहर शुक्ला गुरुजी यांच्याकडे गायकीची तालीम घेत सुप्रसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर,राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे इ.यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि मुख्य म्हणजे प्रणयने नुकताच संगीत विषय घेऊन पदविका पुर्ण केलीयं(MA music). विविध राज्य स्तरीय गायन स्पर्धा,जागतिक सांस्कृतिक महोत्सव इ.ठिकाणी आपली कला सादर करून नाव कमावून विविध सामाजिक संघटना मार्फत देण्यात येणारे “युवा पुरस्काराने” सन्मानीत आहेत.


त्या व्यतिरिक्त मुंबईच्या समाजभारती या त्रैमासिक अंकाचे ते ”प्रसिध्दी प्रमुख” असून मुंबईमध्ये विदर्भातून येणाऱ्या होतकरू लोकांसाठी ४० वर्षापासून समाजसेवेचं कार्य करणाऱ्या “विदर्भ युवक मंडळ कल्याण” चे ते सह कोषाध्यक्ष, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ शाखा कल्याणचे सहसंघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत.

गिटारवादक रोहन झोडगे हा मूळचा अंबरनाथ येथील असून pranay g band मध्ये लीड गिटार प्ले करतो. डिप्लोमांच शिक्षण घेऊन आपल्या छंदाला त्याने करियर निवडलं. संगीत जगतातील नामवंत कलाकारांसोबत त्याने साथ केली असून त्यात प्रामुख्याने हर्षदीप कोर, कविता सेठ, पवनी पांडे तसेच कप्पा टीव्ही,फिफा वर्ल्ड कप,रेट्रो एफ एम, कोक स्टुडिओ प्रो नाईट सारख्या अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत शिवाय निरनिराळ्या प्रसारमाध्यमातून ह्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण सुद्धा झालायं.


कॅजोन वादक नयन मोरे हा कल्याणचा असून सध्या एम.बी.ए. चं शिक्षण सुरु असून सोबत त्याचा रिदमचा ठेका अचूक पकडण्याचा छंद त्याला नवी ओळख देतोय, नयन बद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे तो एका हातांनी अपंग असून त्यावर त्याने मात करत जगण्याची नवी उमेद लोकांपर्यंत पोहोचवलीय नयनने आजवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धेत क्रमांक पटकावला असून मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजनाचं काम सुद्धा चोखपणे बजावण्याचे कौशल्य त्याने अवगत केलंय, त्याच प्रमाणे pranay g या बँडमध्ये ड्रम्सवर स्वप्नील मोरे,कीबोर्डवर श्रीजित बॅनर्जी बेस गिटारवर रोझारिओ लोबो तसेच सहगायक म्हणून नवल कुलकर्णी, सुरुची दीक्षित समावेत इतर आहेत सल्लागार म्हणून नामवंत गिटार वादक, संगीत दिग्दर्शक विनोद बनसोडे आदी समस्त मित्रमंडळी असतात. सगळी मंडळी आपापल्या कामातील नामवंत कलाकार आहेत. शिवाय जर काम आपल्या आवडीचं असेल तर नक्कीच ते करायला अधिकाधिक मज्जा येते..!भविष्यात Pranay G Musicians And Band चे नाव सातासमुद्रापलिकडे असेल ह्यात शंका नाही.

Neha Jawale
Neha Jawale
A journalist. Masters in Mass Communication and journalism. Western Dancer and Singer. Traveler, outspoken...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...