Thursday, October 22, 2020
Home Uncategorized आदरणीय बाळासाहेब !!

आदरणीय बाळासाहेब !!

आदरणीय बाळासाहेब ठाकरे,

नमस्कार | खरं तर तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहात, आणि आई बाबांकडून तुमच्या भाषणांबद्दल इतके ऐकले आहे की तुम्ही घरचेच वाटता, म्हणून तुम्हाला आज खास हे पत्र लिहीते आहे. कसे आहात? वर अटलजी, प्रमोदजींसोबत नक्कीच सगळं चांगलं असणार माहीत आहे मला. महाराष्ट्राच्या आताच्या परिस्थितीपेक्षा तर नक्कीच सगळे आलबेल असणार तिकडे. मात्र आज वरुन महाराष्ट्राकडे बघताना तुम्हालाही हळहळत असणारच ना?

खरं सांगू आई बाबांकडून तुमच्या काळातील शिवसेनेबद्दल खूप ऐकलं आहे . तेव्हा एकतर माझा जन्म झाला नव्हता आणि नंतर मी खूप लहान होते, मात्र तुमच्या त्या सर्व भाषणांबद्दल ऐकून, सभांबद्दल ऐकून, तुमच्या बाणेदारपणापद्दल ऐकून मला मी महाराष्ट्रात त्याकाळात जन्म न घेतल्याचा खूप हेवा वाटायचा. हिंदूंसाठी खंबीरपणे उभे राहणारे तुम्ही, राममंदिरासाठी कणखरपणे भूमिका घेणारे तुम्ही, हिंदुच्यां कत्तली होत असताना त्यांचे रक्षण करणारे तुम्ही किती किती आणि काय काय लिहू? किती भारी वाटतं हा सगळा विचार करून खरंच. मात्र एक सांगू आज बरंच झालं तुम्ही इकडे नाही. असता तर कदाचित शिवसेनेचं हे वीभत्स राजकारण बघूच शकला नसता हो.

तुम्ही गेलात त्या दिवशी मलाही खूप वाईट वाटलं होतं. तुमच्या सारखी एकच अशी राजकीय व्यक्ती मी बघितली जिने नेहमी स्वत:च्या कुठल्याही विधानावर “नाही मी हे बोललोच नव्हतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.” वगैरे म्हटले नाही, जिने नेहमी छातीठोक पणे सांगितले “हो मी हे बोललो आणि माझे हेच मत आहे”. मला तुमचं हे असं बाणेदारपणे वागणं खूप आवडलं. मी आजही तुमचे जुने व्हिडियोज काढून बघते. शरद पवारांना बारामतीचा ममद्या म्हणणे, किंवा काँग्रेस समोर हिजडे झुकतात असे म्हणणे असू देत किंवा इतर कुठलेही विधान. तुम्ही कधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर मान झुकवली नाहीत हो, उलट हिंदुत्वाच्या या दुश्मनांच्या विरोधातच तुम्ही होता. त्याकाळी सत्ता स्थापनेसाठी मोठ मोठे नेते ‘मातोश्री’ वर यायचे. तुम्ही कधीच तटस्थ राहण्याच्या प्रयत्नात आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. मात्र सत्तेसाठी कधी अवाजवी मागण्याही ठेवल्या नाहीत, उलट मुख्यमंत्री पद मला नको असे तुम्ही म्हणाला होता. आणि आज…

बाळासाहेब काय झाले हो या शिवसेनेचे. हीच का ती शिवसेना जिच्या बद्दल माझे आई वडील मला खूप अभिमानाने सांगायचे. हीच का ती शिवसेना जिने हिंदुंचे रक्षण केले, जिने नेहमी राष्ट्रवादासाठी, राष्ट्रासाठी काम केले, राम मंदिरासाठी भूमिका घेतली? नाही हो.. ही तुमची शिवसेना नाही बाळासाहेब.. हे तर एक अभद्र रूप आहे राजकारणाचे. ज्या राममंदिरासाठी तुम्ही इतकी महत्वाची भूमिका घेतली, त्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या कपिल सिब्बलांना आज शिवसेनेची केस देण्यात आली, म्हणजे काय हो? ज्या काँग्रेस राष्ट्रवादी ने सतत हिंदुंना डावलले, सतत सूडो सेक्युलर भूमिका घेत देशासोबत गद्दारीच केली, ज्यांच्या विरोधात तुम्ही पोटतिडकीने बोलायचे आज केवळ सत्तेसाठी, केवळ मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना त्या शरद पवार आणि सोनिया गांधींसमोर लोटांगणे घालतायेत? तुम्ही तत्वांशी कधीच तडजोड करणारे नव्हता, आणि आज तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शिवसेना तत्वांची तिलांजली देत निघाली ‘महाशिवआघाडी’ करायला? मला आणि अखंड महाराष्ट्राला हे नाही पटलंय बाळासाहेब.

तुम्हाला तरी हे पटलं का हो? तुम्ही आज हयात असता तर असं होवू दिलं असतं? केवळ मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावं किंवा आपल्या नातवाला मिळावं म्हणून तुम्ही सत्तेचा हा गलिच्छ खेळ नक्कीच खेळला नसता बाळासाहेब. आज नक्कीच तुम्हाला ही त्रास झाला असणार. उद्या शिवसेना जरी जिंकली ना, तरी संपूर्ण महाराष्ट्र हरलेला असेल.

एक सामान्य नागरिक म्हणून आज मी तुम्हाला इतकंच म्हणेन.. माझ्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिवसेना तुमच्या सोबतच संपली. महाराष्ट्राची शिवसेनेवर निष्ठा आहे, विश्वास आहे, तो केवळ तुमच्यामुळे मात्र आज महाराष्ट्राला दिसले आहे की ही ती शिवसेना नक्कीच नाही. बाळासाहेब तुम्ही गेलात आणि शिवसेना संपली.. हेच खरं आहे, हेच सत्य आहे.

अतिशय जड मनाने,
तुमच्या शिवसेनेचा आदर करणारी,
मात्र आताच्या शिवसेनेवर प्रचंड राग असणारी,

निहारिका पोळ सर्वटे

Niharika Pole Sarwate
Niharika Pole Sarwate
A journalist by profession. Masters in journalism and mass communication. Love to write on politics, culture, entertainment, Lifestyle or any other topic related to Youngsters. Kathak Dancer by heart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...