Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन एक और चाय.. तुमची आमची कदाचित सगळ्यांचीच गोष्ट

एक और चाय.. तुमची आमची कदाचित सगळ्यांचीच गोष्ट


अनेकदा यूट्यूबवर अचानकच असं काही सापडतं, जे बघून असं वाटतं कि अरे हे तर अनेकांसोबत होत असणार. किंवा ही तर खूप ओळखीची गोष्ट आहे. असंच काहीसं माझ्या सोबतही झालं. यूट्यूबवर काही तरी शोधत असताना ‘एक और चाय’ ही गोष्ट माझ्या समोर आली, आणि अशीच ओळखीची गोष्ट आहे, असं वाटून गेलं.

किती लोकांसोबत असं झालं असणार कि त्यांना प्रेम आणि करिअर यातील काहीतरी एक निवडावं लागलं. कॉलेजमध्ये प्रेम झालं, ती व्यक्ति खरंच खूप आवडायची, त्या व्यक्तिसाठी आपण काहीही करु शकतो अशी परिस्थिती असताना एका दिवशी करिअरमुळे प्रेम सोडावं लागेल असं कोणाला वाटलं असेल? असंच झालं या दोघांसोबत. दोघंही अहमदाबादमध्ये शिकत होते, मात्र तिला बंगलोरला चांगला जॉब मिळाला आणि तिने पुढे जायचा निर्णय घेतला. त्यानी शेवटच्या ‘चहा’ साठी तिला बोलावलं मात्र ती आली नाही. आणि आज इतक्या वर्षांनी ते पुन्हा भेटले, त्या शेवटच्या एका चहासाठी.


ते चहा साठी भेटले. त्याच टपरीवरच्या त्यांच्या जुन्या आठवणी, तिने पावसावर केलेली कविता, त्यांच्या छोट्या छोट्या सवयी हे सगळंच त्यांना आठवतं. पण गंमत बघा ना पुरवीसारखं काहीच नसतं. ते म्हणतात ना ‘नातं संपलं तरी प्रेम उरतंच ना’ तसंच काहीसं त्यांच्यासोबत झालेलं असतं.

पावसाळी वातावरण, त्यांच्या नॉस्टॅल्जिक गप्पा आणि तिच्या डोळ्यातले भाव, हे सगळं समीकरण खूप छान जुळून आलेलं आहे. युवराज ठाकुर आणि नमिता दुबे यांनी जिवंत अभिनय करत ही गोष्ट तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनाशी जोडली आहे. कधी कधी दोन वाक्य बोलून, समजावून किंवा अगदी काही नाही तर मनातलं बोलून व्यक्त झालं ना तर अनेक गैर समज दूर होवू शकतात. ही गोष्ट अशीच आहे. बाहेर पावसाळी वातावरण असताना, जेव्हा करायला काहीच नसेल हा व्हिडियो नक्की बघा, कुणाची तरी आठवण तुम्हाला नक्कीच येईल. 

  • निहारिका पोळ सर्वटे
Niharika Pole Sarwate
Niharika Pole Sarwate
A journalist by profession. Masters in journalism and mass communication. Love to write on politics, culture, entertainment, Lifestyle or any other topic related to Youngsters. Kathak Dancer by heart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...