Wednesday, October 21, 2020
Home मनोरंजन होम स्वीट ऑफिस : एक सुरेख वेब सीरीझ

होम स्वीट ऑफिस : एक सुरेख वेब सीरीझ


इंटरनेट वर कंटेंटचा खजिना आहे. मग तो वेगवेगळ्या व्हिडियोजच्या, यूट्यूबर्सच्या माध्यामातून असू देत किंवा वेब सीरीझच्या माध्यमातून असू देत. होम स्वीट ऑफिस अशीच एक सुरेख वेब सीरीझ आहे. डायस मीडियाच्या अनेक धमाकेदार वेब सीरीज पैकी ही देखील एक. ही गोष्ट आहे अधीरा आणि शगुन या दोन चुलत बहीणींची. दोघींनी मिळून ‘हॅप्पीली हिच्ड’ असा ‘वेडिंग व्हिडियोज’चा एक व्यवसाय सुरु केला आहे. म्हणजेच त्या दोघीही आंत्रप्रिनियोर आहेत. आणि ५ भागांची ही वेब सीरीझ त्यांच्या याच व्यवसायाच्या अवती भवती फिरते. मात्र त्यांच्यातील अगदी सहज संवाद आणि या वेब सीरीझ मधील सर्वच कलाकारांचा अभिनय अगदीच भुरळ पाडणारा आहे.


पहिल्याच भागात या दोन्ही बहिणींना त्यांचा पहिला क्लाएंट मिळतो, अधीराचा एक्स बॉयफ्रेंड. आणि त्याच्याच लग्नाची प्लॅनिंग अधीरा कशी करते, शगुन तिला हे सगळं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसं बघायचं हे कसं समजावते आणि अधीराचे वडील या परिस्थितीत तिची कशी मदत करतात हे बघणं गंमतीचं ठरतं.

या वेब सीरीझची मला सगळ्यात जास्त आवडलेली बाब म्हणजे, अधीराच्या आई वडीलांचे पात्र. आजच्या जगात आई वडीलांनी कसं असावं, किंवा आपण व्यवसाय करत असताना त्यात आई वडीलांचा अप्रत्यक्ष रितीने कसा सहभाग असावा याचं उत्तम उदाहरण देणारी ही वेब मालिका आहे. आजच्या ट्रेंडचा व्यवसाय, त्यातील छोट्या मोठ्या गोष्टी आणि घरातून त्यांचं चालललेलं ऑफिस एकूणच वेब मालिकेचा प्लॉट छान जमलाय.एक भाग तर एका क्लाएंटचा व्हिडियो कसा वेगळा असायला हवा यावरच आहे, मात्र अजिबात कंटाळवाणा होत नाही, या वेब मालिकेची खासियत आहे याचे संवाद. आई मुलाच्या लग्नाविषयी काहीतरी महत्वाचं बोलत असताना वडील म्हणतात, “हाँ कचौडियाँ भी खतम हो जाएँगी, जल्दीही जाना पडेगा..”

आपल्या सगळ्यांमधल्याच या अधीरा आणि शगुन आहेत, त्यामुळे आपण या दोघींशी खूप रिलेट करु शकतो. त्यातून अधीराच्या भावाची भूमिका देखील मजेदार आहे. गावो गावी जाऊन डिटेर्जेंट बद्दल किंवा तत्सम गोष्टींबद्दल रिसर्च करणारा तिचा भाऊ, तशी भूमिका लहानच आहे, मात्र बघायला मजा येते.

बरखा सिंह, इशा तलवार, शुभम वढेरा, योगेंद्र टीकू या सगळ्यांनीच आपल्या भूमिका छान वठवल्या आहेत. बरेच दिवसांनी अगदी क्लीन, वेगळ्या विषयावरची साधी सूधी तरीही मस्त वेब सीरीझ बघायला मिळाली. डाएस मीडियाच्या अनेक भन्नाट वेब सीरीझ पैकी ही देखील एक.

कधी कधी रोमँस नसलेली, शिव्या नसलेली, एक्शन नसलेली, साधं सोप्पं घर असेलली वेब सीरीझ बघायला वेगळीच मज्जा येते नाही का? तुम्ही देखील नक्की बघा, आणि कशी वाटली ती आम्हाला कळवा.

  • निहारिका पोळ सर्वटे
Niharika Pole Sarwate
Niharika Pole Sarwate
A journalist by profession. Masters in journalism and mass communication. Love to write on politics, culture, entertainment, Lifestyle or any other topic related to Youngsters. Kathak Dancer by heart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...