Thursday, October 22, 2020
Home मनोरंजन पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे कॉमेडी सिनेमांमध्ये गोलमाल, हाउसफुल, मस्ती, वेलकम, अशा सिनेमांची चालती आहे. या सिनेमांचे पण सिक्वेल्स आले. पण प्रत्येक सिक्वेल हिट गेलाच असं  नाही . याचं  कारण म्हणजे कमकुवत कथानक आणि दिग्दर्शन. त्याच पठडीतला सिनेमा म्हणजे पागलपंती. दिग्दर्शक अनिस बाजमी यांच्या वेलकम सिनेमाला लोकांनी खूप पसंत केलं.  थिएटरवर झळकला होता तेव्हा तर तो गाजलाच, पण टी व्हीवर आज ही लोक तो आनंदाने बघतात. अनिस बाजमीचं कॉमेडी चं  गणित मात्र पागलपंती  सोबत चुकलं . सिनेमातली पात्र जरी पागलपंती करत असली तरी, प्रेक्षक पागल नाहीयेत हे अनिसला आता समजलं असेल. हा सिनेमा आठवडा काय तर वीकएंडला ही गर्दी खेचण्यात अयशस्वी ठरला आहे. याचं  सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे  कमकुवत कथानक आणि थुकराट विनोद.

चित्रपटाची गोष्ट थेट ब्रिटनमध्येच घडते. राज किशोर (जॉन अब्राहम), जंकी (अर्शद वारसी) आणि चंदू (पुलकित सम्राट) या तीन मित्रांची ही कथा. हे तिघे जेथे जातात तेथे काही ना काही बट्याबोळ होत जातो. त्यामुळे हे तिघेही पूर्णपणे बदनाम झालेले. एका अपघातानेच या तिघांची गाठ गँगस्टर असलेले राजाभाई (सौरभ शुक्ला) आणि वायफायभाई (अनिल कपूर) यांच्याशी पडते. आलिशान महालात राहणारे, गाडी-घोडे उडवणारे हे दोघे म्हणजे शहरातील एक बडं प्रस्थ आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी टुल्ली (झाकिर हुसेन) आणि बुल्ली (अशोक समर्थ) यांच्याशी राजा आणि वायफायचा छत्तीसचा आकडा आहे. आता हे तिघे मित्र या गँगस्टरच्या आयुष्यात आल्यावर काय धुमाकूळ घालतात, तो धुमाकूळ म्हणजे ‘पागलपंती’ हा सिनेमा. नो लॉजिक ऑन्ली  मॅड  कॉमेडी ! असं  स्वतःच सिनेमाच्या दिग्दर्शकांनी म्हणवून घेतलं  आहे. बहुदा त्यांना सिनेमा बनवतानाच अंदाज आला असणार त्यामुळे त्यांनी सिनेमाची ही टॅग लाईन निवडली असणार. सिनेमात आणखीन एक व्यक्तिरेखा आहे, ती  म्हणजे नीरज मोदी या पात्राची. भारतात बँक फ्रॉड करून हजारो कोटी लुटून तो विदेशात राहत असून, त्याला पुन्हा भारताच्या हवाली करायचं आहे. या कृतीतून ‘देशभक्ती’ दाखवण्याची आयती संधी लेखक-दिग्दर्शकाला मिळाली. या नीरज मोदीला ‘आयबी’च्या हवाली करण्यासाठीही नायकाचं त्रिकूट धडपड करतं.   आता या सगळ्या गुंत्यामध्ये पैसे लुटण्यासाठी सुरू असलेल्या धडपडी, भूत बंगल्यात लपवलेला खजिना, ‘वेलकम’ स्टाइल स्वीक्वेन्स, आफ्रिकन सिंहांमुळे उडणारी घाबरगुंडी असा सारा मसाला करून ‘पागलपंती’ सिनेमा आकाराला येतो.

मल्टी स्टारकास्ट असून सुद्धा कथानकात इतक्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ केली असल्यामुळे, एका ही कॉमेडी सीनचा मनमुरादपणे  आनंद घेता येत नाही. सिनेमात नुसती पळापळ आणि गुंतागुंत पाहायला मिळते आणि म्हणूनच सिनेमा माती खातो.  उर्वशी रावटेला आणि क्रिती खरबंदा यांना या सिनेमात पाहिलं की यांच्या पेक्षा बोलक्या बाहुल्या बऱ्या असं म्हणावं लागले.

सध्या रिमिक्सचा जमाना आहे त्यामुळे सिनेमातली ३ गाणी जुनी पण रिमिक्स व्हर्जन आहेत. कथा-पटकथेवर काहीही काम झालेलं नाही, त्यामुळे अशा सिनेमांकडून जास्त अपेक्षा करणं  रास्त ठरणार नाही.

Prachee Pakhare
Prachee Pakhare
मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिज्म, टी व्ही अँकरिंग आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पारंगत. अभिनय, गायन , फॅशन आणि फिचर रायटिंगची आवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...